लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व जंबुदीप बौद्ध विहार उद्घाटन प्रसंगी १३, १४, १५ एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन.
शनिवार, 4 अप्रैल 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे भारतरत्न, बोधिसत्व, विश्वभूषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त व जंबुदीप बुद्ध विहार उद्घाटन प्रसंगी १३,१४, १५ एप्रिल २०२६ ला तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे १३ एप्रिल ला सकाळी ९ वाजता जंबुदीप बुद्धविहाराचे उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते करण्यात येईल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. युवराज निजाम मेश्राम प्रोफेसर एन एच कॉलेज ब्रह्मपुरी उपस्थित राहतील. तर धम्मदेशना महामोगलायन प्रेरणाभूमी महाविहार सावंगी, भदंत दीपंकर श्रावणेर उपस्थित राहतील.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे
भंडारा, सरपंच मंदाताई ढोरे, प्रदीप बुराडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज बनसोड, प्रा. धनंजय ढवळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. रात्री ८
वाजता सांस्कृतिक कार्यक्रम १४ एप्रिल ८ वाजता ध्वजारोहण होईल. यावेळी कार्यक्र माचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ध्वजारोहक मोहनलाल बनसोड अध्यक्ष बौद्ध समाज कमिटी यांच्या उपस्थित होईल.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनिअर संजयजी मगर, राजेश मदने, धनंजय मुंडे, नरेश बनसोड, कैलास जांभुळकर व सायंकाळी ५ वाजता धम्म रॅली निज्ञेल.
१५ एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता भोजनदान व रात्री ९ वाजता समाज प्रबोधन कार्यक्रम विजयानंद साळवे चिंचवडकर जामनेर यांचा होईल. तर कार्यक्रमाचे उद्घाटन केतन कुमार मैंद होईल.
गुलाब मेश्राम, पुरुषोत्तम बडोले, धर्मेंद्र राऊत, यांनी संजय मैंद, सुषमाताई मुळे, सविता सहारे, एम डी मस्के, यांच्या उपस्थितीत होईल.
कार्यक्रमाचा लाभघेण्याचे आवाहन मोहनलाल बनसोड अध्यक्ष बौद्ध समाज कमिटी, चुनीलाल शहारे उपाध्यक्ष, चंद्रकिशोर ढवळे सचिव, प्रशांत वासनिक सहसचिव, प्रीतम जांभुळकर कोषाध्यक्ष, पटवारी जनबंधू, साहिल राऊत, निखिल मेश्राम, शुभम जांभुळकर, मिथुन वासनिक, पवित्रा मेश्राम कलाबाई मेश्राम, प्रियंका मेश्राम, तरुणा मेश्राम, अस्मिता जांभुळकर शालुबाई जांभुळकर, किरण जांभुळकर, मीनाक्षी हुमने, सईबाई बडोले, किरण शहारे, हिरण बाई शहारे व समस्त बौद्ध समाज कमिटी चप्राड यांनी केलेले आहे.
0 Response to "लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व जंबुदीप बौद्ध विहार उद्घाटन प्रसंगी १३, १४, १५ एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें