(भक्ती योग) नाम हेच परमेश्वराची भेट करवून देईल......
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
गंगेचा किंवा इतर कोणत्याही उगम जर आपण पाहिला, तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल, पुर्व पुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो,पुढे त्या झऱ्याचे नदीत रूपांतर होते,आणि अनेक ठीकानांहून वाहात आल्याने पुढे ते पाणी गढूळ बनते तसेच आपले जिवनही व्यवहारातल्या चांगल्या वाईट गोष्टींच्या सानिध्यामुळे पुढे गढुळ बनुन जाते,परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होवून सर्व गाळ तळाशी बसतो.
त्याप्रमाणे कोणतेही (कर्म) काम करतांना भगवंताचे नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसुन,वर निर्मळ जिवनाचा प्रत्यय येतो,कोणताही दाढीवाला असोत किंवा कोणताही साधु येवून सांगू लागला की, परमार्थ असा आहे,परमार्थ तसा आहे,(कर्मकांड,अंधश्रद्धा युक्त भक्ती)किंवा सकाम भक्ती करायला लावत असेल तर तुम्ही त्याला खुशाल छातीठोकपणे सांगा. कि, नावाशिवाय परमार्थ नाही,कर्म करतांना नाम घेऊन समाधानात राहाने हाच खरा परमार्थ, भगवंताचे प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला,नामासारखे दुसरे साधन नाही, आपलेपणाचे प्रेम किती असते!एक मुलगा आईजवळ राहात होता,पुढे त्याचे लग्न झाले,त्याने बायको आपली मानली,तिच्याबद्दल त्याला प्रेम ऊत्पन्न झाले,पुढे ती जरा कृश झाली, त्याला वाटले ही फार शहानी आहे,निट बोलत नाही हिला आपल्या आईचा जाच असला पाहीजे,म्हणून तो वेगळा निघाला आपले म्हटल्याने केवढे प्रेम ऊत्पन्न होते पहा!तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्याजवळ आपलेपणा निर्माण केला पाहीजे.
,देवाचे प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येवू शकेल, नुसते पुस्तक वाचुन परमार्थ सांगणारे पुष्कळ भेटतील पण आचरणात आणुन सांगणारे विरळच,किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच पडतो, एखादा म्हातारा माणूस आपन पाहीला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो,मुले बाळे असतात, सर्व तर्हेने तो सुखी असतो,परंतू मृत्युसमयी म्हणतो नातवाची मुंज पाहीली असती तर बरे झाले असते!माणुस वासनेत कसा गुंतलेला असतो,ते यावरून कळेल,संसार कितीही केला तरी तो पुर्ण होवू शकत नाही,तो अपुर्णच राहातो,मनुष्याच्या जीवनातील तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही,त्याच्या जिवाला समाधान एका परमेश्वराच्या भेटीतच मिळू शकते,आणि याकरीता आयुष्याच्या सुरवाती पासूनच नामाची कास धरा,ते नाम मृत्युसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करवून देईल याची पुर्ण खात्री बाळगा,अत्यंत गुह्यातले गुह्य नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय....
महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव
उरळीकांचन पुणे
0 Response to " (भक्ती योग) नाम हेच परमेश्वराची भेट करवून देईल......"
एक टिप्पणी भेजें