(मंथन)आपलेच जवळचे चुगरखोर असतात.
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
अनेकदा आपल्या जवळचे विश्वासू लोकच (मित्र. नातेवाईक) चुगली करतात. हे लोक तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागे गैरसमज पोहचवतात. शांतता भंग करतात आणि गोष्टी फुगवून सांगतात ज्यामुळे कौटुंबिक किंवा वैयक्तिक संबंध खराब होऊ शकतात तोंडांत साखर, पोटात विष: समोर असताना खुप गोड बोलतात. पण तुमच्या पाठीमागे तुमचीच बदनामी करतात हे लोक नेहमी स्वतः ला तुमच्या जवळचे दाखवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांना तुमच्याबद्दलची सर्व माहिती मिळेल ज्यांच्यावर आपण सर्वांधीक विश्वास ठेवतो किंवा ज्यांना आपण आपले मानतो. तेच आपल्या सोबत इकडे - तिकडे बोलताना दिसतात यातच आपण "घरचा भेदी म्हणतो" अशा लोकांपासून स्वतः ला वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे तुमच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी किंवा महत्वाच्या गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करणे टाळा. समोरची व्यक्ती कितीही जवळची असली तरी काही गोष्टी स्वतः पुरत्याच ठेवणें सुरू सुरक्षित असते जे लोक तुमच्यासमोर खुप गोड बोलतात आणि इतरांची तुमच्याकडे चुगली करतात. तेच लोक तुमची चुगली दुसऱ्याकडे करण्याची दाट शक्यता असते जर तुम्हाला कळाले की कोणीतरी तुमची चुगली केली आहे. तर लगेच चिडून प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहून त्या व्यक्तीपासुन हळूहळू अंतर निर्माण करणे गरजेचे आहे अनुभवातून शिका ज्या व्यक्तीने एकदा तुमचा विश्वासघात केला आहे तिला पुन्हा तुमच्या खाजगी आयुष्यात प्रवेश देऊ नका. शेवटी. कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्या हातात असते अशा चुगलखोर लोकांमुळे त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे कधीही चांगले अशा लोकांपासून सावध राहणे आणि खाजगी गोष्टी गुप्त ठेवणे हाच उत्तम उपाय आहे.
माझ्या जीवनातला सर्वात मोठा घडलेला अनुभव मी सांगतो आहे.
लेखक
साजन बोकडे लाखांदूर तालुका
जिल्हा भंडारा
९५७९२९४३१९
0 Response to "(मंथन)आपलेच जवळचे चुगरखोर असतात."
एक टिप्पणी भेजें