-->
भंडारा जिल्हा कारागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्सव.

भंडारा जिल्हा कारागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्सव.



• भंडारा जिल्हा कारागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती प्रबोधनात्मक व सांस्कृतिक 
कार्यक्रमातून उत्साहात साजरी.


हर्षवर्धन देशभ्रतार 
साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- भंडारा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
     या निमित्ताने बंदीवान कैदी बांधवांसाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन तसेच मनोरंजनात्मक संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवले होते, तर महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शविली.
     कार्यक्रमास कारागृह अधिकारी चोपकर साहेब, मुळे साहेब, निस्ताने सुभेदार, बहुआयामी कलावंत प्रा. प्रियदर्शन सोनटक्के, प्रबोधनकार प्रवीण भोंदे, तसेच सोमदेव चोपकर, सुनील राखडे, वसंता राऊत, संजय बागर, शिलानंद नंदागवळी, महेंद्र तिरपुडे, प्रकाश घरत, मेघा शिंदे (महिला शिपाई), शुभांगी मार्बते, पल्लवी निंबार्त, अदिभ बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
     कार्यक्रम कारागृह अधीक्षक मा. आडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य देखरेखीखाली यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी मुळे साहेब, मिलिंद दहिवले आणि डॉ. देवानंद नंदागवळी यांनी मार्गदर्शन केले.
     डॉ. देवानंद नंदागवळी यांनी आपल्या मार्गदर्शनात बंदीवानांना प्रेरणा देताना सांगितले की, परिस्थिती माणसाला थांबवू शकत नाही, जर त्याच्यात बदलण्याची जिद्द असेल. कारागृहात असतानाही वाचन, शिक्षण आणि नवीन कौशल्ये आत्मसात करून नव्या जीवनाची पायाभरणी करता येते. स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक विचार अंगीकारणे आवश्यक असून, चुका मान्य करून त्यातून शिकणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
     डॉ. मिलिंद दहिवले यांनीही आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत, प्रत्येक व्यक्तीसमोर स्वतःला बदलण्याची आणि नव्याने उभे राहण्याची संधी असते, असे सांगितले.
      यावेळी बहुआयामी कलावंत प्रियदर्शन सोनटक्के, प्रबोधनकार प्रवीण भोंदे, सोमदेव चोपकर, वसंता राऊत व सुनील राखडे यांनी आपल्या सुमधुर वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
       प्रसंगी कारागृह अधिकारी चोपकर साहेब व मुळे साहेब यांना भारतीय संविधानाच्या प्रती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृह अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले.

0 Response to "भंडारा जिल्हा कारागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्सव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article