-->
कटकवार विद्यालयात योग शिबिर.

कटकवार विद्यालयात योग शिबिर.

विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.पतंजली समितीचा पुढाकार.

            नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 साकोली :- येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात एकदिवसीय मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनाची गुरुकिल्ली समजून सांगतानाच योगासनांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती तथा पतंजली योग समिती प्रचारक प्रिती डोंगरवार यांनी या शिबिरात योग मार्गदर्शिका म्हणून भूमिका बजावली. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे मानवी शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम विषद केले. केवळ शारीरिक व्यायाम न करता योगाकडे जीवन जगण्याची कला म्हणून पाहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दैनंदिन जीवनातील तणावमुक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी योगाचे असलेले स्थान त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी

योग प्रशिक्षणाचे धोरण आणि अंमलबजावणी

भारतात योग प्रशिक्षणाला मोठी चालना देण्यासाठी २०२६ च्या अर्थसंकल्पात आयुर्वेदासह १.५ लाख केअर गिव्हर्सना योग प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. याच धोरणाचा भाग म्हणून शाळा आणि स्थानिक पातळीवर योगाचे धडे दिले जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले असून त्या अनुषंगाने या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

मुख्याध्यापक बी. एस. लंजे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक शिवदास लांजेवार आणि अशोक गायधने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी केशव कापगते, विनोद हातझाडे, राजेश

भालेराव, जागेश्वर तिडके, ज्ञानेश्वर लांजेवार, शीतल साहू, दिनेश ऊईके, संजय पारधी, कमलेश मडकवार आदी सहाकर्य केले. यावेळी शाळेती विद्याथी उपस्थित होते.

0 Response to "कटकवार विद्यालयात योग शिबिर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article