निवडणूक आयोगाचा सफाई मोड.
रविवार, 5 अप्रैल 2026
Comment
तुमचं नाव मतदार यादीत आहे परंतु 2002 च्या रेकॉर्डची जोडले नसेल तर धोक्यात येऊ शकते
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील पवनी, भंडारा, लाखांदूर ,लाखनी , मोहाडी ,तुमसर साकोली तालुक्यातील मतदारांना सूचित करण्यात येते की ,भारत सरकार निवडणूक आयोगाचे एस आय आर कार्यक्रमानुसार सन 2002 च्या मतदार यादीतील मतदारांची ताळमेळ ,जोडणी, मॅपिंग करण्याचे काम सुरू असून त्या अंतर्गत त्यांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत नाही व ज्यांचे वय 18 ते 45 वयोगटातील आहे अशा गावात लग्न होऊन आलेल्या मुली (सुना )व ज्या मतदारांचे 2002 च्या मतदार यादीत नाव नाही आहे अशा व्यक्तींनी आपले आई-वडील किंवा आजोबा हे सर्व 2002 मध्ये ज्या ठिकाणी राहत होते व त्यांचे तिथल्या मतदार यादीत नाव होते त्या गावातील जिल्ह्याच्या ,तालुक्याचा, विधानसभा मतदारसंघ क्रमांक ,मतदार यादी भाग क्रमांक व यादी भाग अनुक्रमांक संबंधित तहसील कार्यालय किंवा बीएलओ यांच्याकडून किंवा voters.eci.gov.in मधून प्राप्त करून आपले गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एरो यांच्याकडे दिनांक 7 एप्रिल 2026 पर्यंत जमा करावे गावामध्ये मतदार यादीचे काम करिता BLO (बीएलओ) म्हणून तलाठी ग्रामसेवक शिक्षक कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे करिता संबंधित BLO( बीएलओ) यांच्याशी संपर्क साधावा
तसेच मतदार यादीत ज्या मतदारांचे फोटो अपष्ट कृष्णधवल आहेत त्यांनी कलर पासपोर्ट फोटो BLOकडे जमा करावे .वर्ष 2002 ची मॅपिंग व कलर पासपोर्ट उपलब्ध करून देणे , सर्व मतदारांनी BLO यांना सहकार्य करावे .लग्न होऊन आलेल्या मुली (सुना) यांनी सण २००२ चा उपलब्ध करून द्यायच्या तपशील खालील प्रमाणे मतदाराचे नाव ,आई-वडील चे नाव ,विधानसभा मतदारसंघ क्रमांक ,मतदार यादी भाग क्रमांक ,यादी भागातील अनुक्रमांक , अशाप्रकारे माहिती उपलब्ध करून द्यावी. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी माधुरी तिखे, सतीश साळवे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व शुभदा धुर्वे निवडणूक नायब तहसीलदार पवनी यांनी पवनी तालुक्यातील मतदारांना आवाहन केलेले आहे.
0 Response to "निवडणूक आयोगाचा सफाई मोड."
एक टिप्पणी भेजें