-->
तालुकास्तरीय झाडीपट्टी कलावंत मेळाव्यात कवी,गायक उमेश बोरकर यांचा जाहीर सत्कार.

तालुकास्तरीय झाडीपट्टी कलावंत मेळाव्यात कवी,गायक उमेश बोरकर यांचा जाहीर सत्कार.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

गोंदिया :- श्री अमर विठोबा नारीशक्ती लोककला व क्रीडा बहुउदेशीय संस्था माहुरकुडा द्वारा आयोजीत एक दिवशीय तालुका स्तरीय झाडीपट्टी लोक कलावंत  मेळावा दिनांक ३१ मार्च  २०२६ सकाळी ११:०० वाजता महात्मा फुले चौक, गजानन महाराज मंदिरा समोर केशोरी ता. अर्जुनी/ मोर जिल्हा गोंदिया या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खडी गंमत, गोंधळ, कलापथक, दंडार, किर्तन, भजन, कव्वाली, पोवाडे, डॉन्स ग्रुप, देवी जागरण गित, दिंडी ग्रुप, परमात्मा एक भजन मंडळ, या सह विविध कलेचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी सातलवाडा येथील कवी गायक उमेश बोरकर यांचा शाल, श्रीफळ प्रशस्तीपत्र ,  व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले उमेश बोरकर यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून आर्केस्ट्रा देवी जागरण परमात्मा एक भजन, कव्वाली, कलापथक, भीम गीत गायन, अशा अनेक प्रकारच्या कला आपल्या गायनाच्या माध्यमातून श्रोत्यांवर कलेचा ठसा उमटविला आहे त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मा. नंदकुमार पाटील गहाने सरपंच केशोरी, योगेश नाकाडे राष्ट्रवादी कॉ. अध्यक्ष, श्रीकांत घाटबांधे जी.प. सदस्य गोंदिया, गुलाब सेंन्डे पो.पाटील, घनश्याम सेंन्डे, प्रकाश पाटील गहाने, स्वरसम्राट दिवाकर बारसागडे, दशरत पाटील गायकवाड, दादाजी गायकवाड व इतरही मान्यवर    याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अमर ठेंगरी, आशिष ढेंगरी, तेजराम बन्सोड, कविता मेश्राम, जिजा शेन्डे, रेखाताई राणे, ममता सेंन्डे,भिमाई महीला भजनी मंडळ बाकटी, रमाई भजनी मंडळ परसटोला, रमाई भजनी मंडळ ईटखेडा, व ईतरही भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उमेश बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या आयोजीका नाट्य कलावंत शालीनीताई डोंगरे यांनी मानले.

0 Response to "तालुकास्तरीय झाडीपट्टी कलावंत मेळाव्यात कवी,गायक उमेश बोरकर यांचा जाहीर सत्कार. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article