-->
संतप्त शेतकऱ्याने उभ्या बागेत बैल सोडले...

संतप्त शेतकऱ्याने उभ्या बागेत बैल सोडले...



• खर्चही निघणे झाले कठीण

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर :- जगाचा पोशिंदा असलेल्या 'राजाचा' दर्जा मिळालेल्या बळीराजाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या शेती पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील चुन्नीलाल बारबैले नामक संतप्त शेतकऱ्याने हताश होऊन अखेर टोकाच्या रागातून आपल्या एक एकर उभ्या टमाटरच्या बागेत गुरे (बैल) चारण्यासाठी सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

तालुक्यातील वैनगंगा नदी पात्रालगत असलेल्या तामसवाडी (सितेपार) हे गाव व येथिल शेतकरी पुर्वाश्रमीचे टमाटरच्या शेती उत्पादनासाठी जिल्हाभरात प्रसिद्ध आहेत. परंतु त्याच गावांतील अल्पभूधारक शेतकरी चुन्नीलाल बारबैले यांच्यावर हातातोंडाशी आलेला घास बाजारात विकण्याऐवजी

जनावरांच्या तोंडात टाकण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत टोमॅटोचे दर कमालीचे घसरले आहेत. तामसवाडी येथील या शेतकऱ्याने मोठ्या आशेने एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सध्या बाजारभाव इतके खाली आले आहेतकी, मालबाजारातनेण्याचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.

शेतीत भरमसाठ गुंतवणूक करून जमिनीची मशागत, ट्रॅक्टरचा खर्च, महागडी बी-बियाणे आणि खते यासाठी हजारो रुपये खर्च झाले. औषध फवारणीचा खर्च कीड आणि रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. व टोमॅटो तोडणीसाठी लागणारा मजुरी खर्च आणि वाहतूक खर्च मिळून जेवढे पैसे लागतात, तेवढेही उत्पन्न बाजारातून मिळत नाही.

बाजारात सध्या टोमॅटो ४० ते ५० रुपये प्रति कॅरेट या दराने विकला जात आहे. म्हणजेच साधारणपणे २ रुपये

लागवडीचा खर्च निघणेतरदूरच, पण तोडणी करून बाजारात नेले तर वाहतुकीसाठी खिशातून पैसे द्यावे लागत आहेत. अशा स्थितीत रक्ताचं पाणी करून पिकवलेला हा माल सडताना पाहण्यापेक्षा तो जनावरांना खायला दिलेला आहे.

चुन्नीलाल बार बैले, शेतकरी तामसवाडी

किलोपेक्षाही कमी भाव शेतकऱ्याच्या पदरात पडत आहे.

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडलेली असताना, दुसरीकडे शेतकऱ्याचा माल मातीमोल भावाने विकला जात आहे. तामसवाडी येथील हीघटना केवळ एका शेतकऱ्याची नसून, संपूर्ण शेतकरी वर्गाच्या हतबलतेचे जिवंत उदाहरण आहे. आता तरी सरकार याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

0 Response to "संतप्त शेतकऱ्याने उभ्या बागेत बैल सोडले..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article