-->
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती व एशियन भीमपर्व न्यूज चॅनलच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा.

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती व एशियन भीमपर्व न्यूज चॅनलच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंड वर महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एशियन न्यूज भीम पर्व चॅनल चा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक सुरेश खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचारवंत प्राध्यापक शंकर बागडे होते.
 

तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा देवश्री कापगते, उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे, नगरसेवका मीना लांजेवार, नगरसेवका वैशाली लांजेवार ,नगरसेविका साहिली डोनोळे,नगरसेविका निर्मला नंदेश्वर ,नगरसेविका स्मिता सिडाम ,नगरसेविका रेणुका गणवीर, ब्ल्यू स्टार्म टीव्ही चॅनेल चे संपादक संजीव भांबोरे, प्रबोधनकार भावेश कोटांगले, प्रबोधनकार सुभाष कोठारे, तनुजा नागदेवे, उपस्थित होते .यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण पाहुण्यांचे स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नगरसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एशियन व भीम पर्व न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक डी.जी रंगारी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पूजा वासनिक, शितल नागदिवे यांनी केले तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. सदर कार्यक्रमात शीतल नागदेवे व त्यांचा संच यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचप्रमाणे सुभाष कोठारे नागपूर व त्यांच्या संच यांच्या भीम गीत प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वंचित तर्फे भोजनदानाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अश्विन रंगारी, जयेश नागदेवे ,उत्तमा गडपायले, स्वर्णमाला गजभिये, प्रज्ञा दिरपुडे, यांनी सहकार्य केले.

0 Response to "महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती व एशियन भीमपर्व न्यूज चॅनलच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article