जातीनिहाय जनगणना सुरू… पण OBC साठी स्वतंत्र कॉलम नाही; न्याय कसा मिळणार?.
शनिवार, 4 अप्रैल 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- देशभरात १ एप्रिलपासून जातीनिहाय जनगणनेची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत असतांना OBC समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा समोर येत आहे.
त्यामुळे OBC समाजाची अचूक लोकसंख्या, शैक्षणिक व आर्थिक स्थिती, तसेच सरकारी योजनांमधील सहभाग याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सामाजिक संघटना व OBC नेत्यांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्या समाजाची अचूक लोकसंख्या व सामाजिक स्थितीची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते.
आरक्षण, शैक्षणिक सुविधा, नोकरीतील प्रतिनिधित्व, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ यांचे नियोजन हे लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरत असते. मात्र OBC समाजाची अधिकृत लोकसंख्या आजही निश्चितपणे उपलब्ध नाही. याआधी Mandal Commission ने १९८० मध्ये OBC लोकसंख्या सुमारे ५२ टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु त्यानंतर अधिकृत जातीनिहाय जनगणना झालेली नाही.
OBC संघटनांची मागणी आहे की, देशभरात होणाऱ्या जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम ठेवावा आणि प्रत्येक जातीची अचूक नोंद करावी. अन्यथा OBC समाजाची खरी संख्या कधीच समोर येणार नाही आणि त्यामुळे धोरणे बनवतांना या समाजावर अन्याय होणार अशी भिती निर्माण झाली आहे . काही राज्यांनी स्वतःच्या पातळीवर जात सर्वेक्षण केले असले तरी देशभर एकसमान जनगणना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर अनेक सत्ताधारी मंत्री, खासदार आणि आमदार शांत असल्याची टीका सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. “
जनगणना जर अपुरी असेल, तर न्याय कसा मिळणार?” असा सवाल OBC समाजातून विचारला जात आहे.
जातीनिहाय अचूक माहिती मिळाल्यास समाजाच्या विकासासाठी योग्य योजना, निधी वाटप आणि प्रतिनिधित्व निश्चित करता येईल.
त्यामुळे जातीनिहाय जनगणना आणि OBC साठी स्वतंत्र कॉलम हा आता केवळ प्रशासकीय विषय नसून सामाजिक न्याय आणि अधिकाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
त्या अनुसंघाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केले .
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ . बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजुरकर , राष्ट्री समन्वयक डॉ . अशोक जीवतोडे इंद्रजीत सिंह कमलेश गुप्ता कार्याध्यक्ष प्रा . शेषराव येलेकर शरद वानखेडे सुभाष घाटे डॉ. प्रकाश भागरथ दिनेश चोखारे रत्नमाला पिसे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महिला अध्यक्ष ज्योती ढोकणे बीसी वेल्केअर असोसिएशन तेलंगाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजुला आंध्र प्रदेश चे अध्यक्ष शंकर अण्णा ओबीसी महासभाचे धर्मेंद्र कुशवाह प्रकाश भागरथ गुणेश्वर आरिकर एकनाथ तारमाळे प्रकाश साबळे परमेश्वर राऊत शिव प्रसाद शाहू सुरज बेलोकर ऋतिका डफ श्रीकांत मसमारे शकील पटेल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ . मुकेश पुडके रवी टोंगे विक्रम गौड के . झेड . शेंडे उमेश सिंगनजुडे प्रभाकर कळंबे अंबादास
मंदुरकर सदानंद बुरडे अण्णा विजय डवंगे वाय . टी . कटरे भावना बावनकर सोनुने सर पिनाटे सर राम कुडाळ तसेच भंडारा जिल्ह्यातील इतर ओबीसी बांधव व ओबीसी समाजाने सरकारचा निर्णयावर नाराजी व्यक्त केले .
0 Response to "जातीनिहाय जनगणना सुरू… पण OBC साठी स्वतंत्र कॉलम नाही; न्याय कसा मिळणार?."
एक टिप्पणी भेजें