-->
तुमसरात परमात्मा एक समाज भवन लोकार्पण सोहळा संपन्न .

तुमसरात परमात्मा एक समाज भवन लोकार्पण सोहळा संपन्न .


 
• आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक ५, नेहरूनगर येथे परमात्मा एक समाज भवन (रु. ३० लक्ष) बांधकामाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी  
 
भंडारा/तुमसर :- मानवधर्माचे संस्थापक, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि सत्याधिष्ठित जीवनाचा संदेश देणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा सोहळा आज दि:-4/4/2026 ला आयोजित करण्यात आला.

 या कार्यक्रमास तुमसर नगरीचे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण पार पडले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या समाज भवनामुळे परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.

“परमात्मा एक समाज भवन" हे केवळ एक इमारत नसून सामाजिक एकात्मता, संस्कार आणि समाज विकासाचे केंद्र ठरेल. आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमुळे नेहरूनगर परिसरात ही महत्त्वपूर्ण सुविधा उभी राहिली, याचा आम्हाला आनंद आहे.बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त हा लोकार्पण सोहळा होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांनी दिलेला अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि सत्याधारित जीवनाचा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.या समाज भवनाच्या माध्यमातून परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल असा मला विश्वास आहे.असे नगरा अध्यक्ष सागर गभने यांनी आपले मत व्यक्त केले.

0 Response to "तुमसरात परमात्मा एक समाज भवन लोकार्पण सोहळा संपन्न ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article