सामाजिक उपक्रमांतर्गत 9 जून ला पत्रकार नरेंद्र मेश्राम जिल्हा स्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित.
शुक्रवार, 29 मई 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
अ"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी पत्रकारितेची दखल घेऊन द.जागर मराठी चे भंडारा जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम यांना जिल्हा स्तरीय पत्रकारिता पुरस्काराने 9 जून 2026 ला सकाळी 11वाजता सम्यक बुद्ध विहार पहेला या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे.यात कार्यक्रमाचे उद्घाटक दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक व ज्ञानपंख न्यूज चैनल चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार खुशाल बोपचे राहणार आहेत. विशेष आकर्षक म्हणून फिल्म अभिनेते अश्विन कुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, नृत्यांगना वैशाली मडावी, ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर, संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष रोशन जांभुळकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, सरपंच शिवशंकर मुंगाटे अड्याळ,अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ देऊन, सत्कार करण्यात येणार आहे. त्यात नरेंद्र मेश्राम द.जागर मराठी चे भंडारा जिल्हा प्रतिनिधी यांना जिल्हा स्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत.
0 Response to "सामाजिक उपक्रमांतर्गत 9 जून ला पत्रकार नरेंद्र मेश्राम जिल्हा स्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित."
एक टिप्पणी भेजें