मनोहर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८५.७१ टक्के.
रविवार, 3 मई 2026
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय, गुरढा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ८५.७१% लागला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत आहे. या परीक्षेत महाविद्यालयातून एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, मुलींनी निकालात बाजी मारली असून प्रथम तीन क्रमांकावर विद्यार्थिनींनीच आपले नाव कोरले.
आहे. प्रथम माधवी दयाराम टेकामः ८२.६७% (४९६ गुण) द्वितीय सेजल पुरुषोत्तम कांबळे : ८१.६७% (४९० गुण) तृतीय अम्रिता संतोष शहारेः ६९.५०% (४१७गुण) यात प्राविण्य श्रेणीत ०२, प्रथम श्रेणी ०६, द्वितीय
श्रेणी १९, तृतीय श्रेणी ०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Response to "मनोहर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८५.७१ टक्के."
एक टिप्पणी भेजें