-->
अडयाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हुसेन शेंडे पवनी तालुक्यात प्रथम.

अडयाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हुसेन शेंडे पवनी तालुक्यात प्रथम.


• महाविद्यालयाने कायम ठेवली उत्कृष्ट निकालाची परंपरा.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ कनिष्ठ महाविद्यालय अडयाळ येथील बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल(2 मे ) रोजी घोषित झाला. त्यामध्ये महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. वाणिज्य शाखेचा ९६ टक्के तर कला शाखेचा निकाल ७७ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून हुसेन गणेश शेंडे ८५.५० टक्के‌ गुण घेत विद्यालयातून प्रथम व पवनी तालुक्यात वाणिज्य शाखेत प्रथम आला आहे. सलुनी अरुण चुधरी हिने ८१.५० टक्के गुण घेत विद्यालयात दुसरा क्रमांक मिळविला. कला शाखेत विद्यालयातून निशा राजेश शहारे प्रथम , प्रज्वल कुंडलिक करंजेकर द्वितीय क्रमांक मिळविला. इंग्रजी ३, मराठी २५, अर्थशास्त्र ८, भूगोल ५, समाजशास्त्र १०, इतिहास ४, सचिवाची कार्यपद्धती ६, वाणिज्य संघटन ८, पुस्तपालन व लेखाकर्म ७ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. 

पवनी तालुक्यात वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या हुसेन शेंडे यांचा घरी जाऊन प्राचार्य सी.एम. बावने यांनी सत्कार केला.यावेळी प्रा. सचिन जिभकाटे, प्रा.दीपक फुंडे, प्रा.संजय सहारे, वरिष्ठ लिपिक बबन निखारे, कनिष्ठ लिपिक राजू काटेखाये,प्रा.लोमेश जांभूळकर उपस्थित होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कलेवाडा सारख्या छोट्याशा गावात राहून हुसेनने यश मिळविले आहे.

0 Response to "अडयाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हुसेन शेंडे पवनी तालुक्यात प्रथम."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article