पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार शिवराज साने सर (संगीतकार ) यांना प्रदान.
सोमवार, 4 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
पूणे/ऊरूळी कांचन :- येथील डॉ मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी डॉ मनीभाई देसाई यांच्या 106 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला. संगीत व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री शिवराज साने सर यांना ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेली 20 वर्षे ऊरूळी कांचन आणि परीसरात संगीत क्लासेस सुरू करून नाममात्र दरात संगीत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सादर केले साने संगीत क्लासेसच्या माध्यामातून आकाशवाणी रेडिओ केंद्रवर कार्यक्रम सादर केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये ना. रविंद्र साठे (खादी ग्रामोद्योग मंत्री ) जयश्री पाटील (पी.एस. आय. राष्ट्रपती पदक विजेते) अदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्थळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह टिंबर मार्केट पुणे येथे होते. व आयोजन ह.भ.प. डॉ रविंद्र भोळे ( हिंदू रत्न पुरस्कार विजेते) प्रमुख राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा साळवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ नार्मन नार्टन सर यांनी केले.
0 Response to "पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार शिवराज साने सर (संगीतकार ) यांना प्रदान."
एक टिप्पणी भेजें