वनविभाग द्वारा बिबट च्या पील्यानां केले जेरबंद.
रविवार, 3 मई 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- आज दि.01/05/2026 रोजी भंडारा बनविभागातील अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणारे सहवनक्षेत्र अड्याळ मधील नियतक्षेत्र- केसलवाडा मौजा खापरी येथील गावालगत असलेल्या शमसान भुमीच्या बंदल असलेल्या नाल्या मध्ये सकाळी सुमारे 5.00 दरम्यान वन्यप्राणी बिबट (मादा) व 2 पिल्ले (एक नर व एक मादा) असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती प्राप्त होताच श्री. योगशे आर. शर्मा वनपरिक्षेत्र अधिकारी, अडयाळ यांनी आपल्या अधिनस्त असलेले वनरक्षक व वनकर्मचाऱ्यांना तात्काळ मौकास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या व स्थानिकांच्या जमावास वन्यप्राणी संघर्षापासुन हानी होऊ नये याकरीता योग्य सुचना देण्यात आले.
मागिल काही दिवसांपासुन मोजा खापरी येथे पशुहानीचे घटना घडत असल्याने तसेच वन्यप्राणी बिबट नी मानव अधिवास क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे मानव वन्यप्राणी संघर्ष घटना होण्याची शक्यता टाळण्यासाठी बिबट वन्यप्राण्यास जेरबंद करण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे अडयाळ वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मिळून मौकास्थळी पिंजरा लावण्यात आला व वन्यप्राणी बिबट ला जेरबंद करण्याची कार्यवाही करण्यात आली,
डॉ. मिसलवार पशुवैद्यकीय अधिकारी अड्याळ यांच्याकडुन वन्यप्राणी बिबट व तिची दोन पिल्ले ची तपासणी करण्यात आली. तपासणी करुन सदर वन्यप्राणी व पिल्ले फिट असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी अडयाळ यांनी कळविले. त्यामुळे जेरबंद करण्यात आलेला वन्यप्राणी बिबट व तिची दोन पिल्ले शारिरीक दृष्टया सदृद्ध असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतल्याने सदर वन्यप्राण्यास निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सदर वन्यप्राणी बिबट व तिची दोन पिल्ले बचाव कार्यमध्ये मा.योगेंद्र सिंग, उपवनसंरक्ष भंडारा, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) भंडारा, श्री. योगेश आर. शर्मा, वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ, श्री. शुभम मोदनकर जिवशास्त्रज्ञ, श्री. आर. आर. दुनेदार, वनपाल अड्याळ, श्री. दिपक रंगारी क्षेत्र सहाय्यक माडगी पूर्व, श्री. निलेश श्रीरामे, वनरक्षक अडयाळ, श्री. संदीप भुसारी वनरक्षक केसलवाडा, क. आर.व्हि. घोनमोडे, व अड्याळ वनपरिक्षेत्राती सर्व कर्मचारी तसेच RRT टीम चे सदस्य यांनी सदर कामी महत्वाची भूमिका पार पाडली.
0 Response to "वनविभाग द्वारा बिबट च्या पील्यानां केले जेरबंद."
एक टिप्पणी भेजें