जो समाज पैसा, श्रम व वेळ योग्य दिशेने वापर करीत नाही तो आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही..ॲड.डॉ.सत्यपाल कातकर..
शुक्रवार, 8 मई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
राजुरा :- गोयेगांव मंडल- केरामेरी,जिल्हा- कुमराम भीम आसिफाबाद, तेलंगणा येथे दिनांक:२९ एप्रिल २०२६ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण आ.श्रीमती कोवा लक्ष्मी,आमदार, कुमराम भीम आसिफाबाद यांचे हस्ते व ॲड.
डॉ.सत्यपाल कातकर,अ
धिवक्ता,उच्च
न्यायालय तथा मनोवैज्ञानिक,
राजुरा,महाराष्ट्र यांचे प्रमुख उपस्थित व मधु बावलकर साहित्यिक कवी,आदिलाबाद यांचे अध्यक्षते खाली पार पडले,याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲड. डॉ.सत्यपाल कातकर,
अधिवक्ता,उच्च न्यायालय व
आ.श्रीमती कोवा लक्ष्मी,आमदार, कुमराम भीम आसिफाबाद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड.डॉ. सत्यपाल कातकर म्हणाले, "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला स्वतंत्र दर्जा दिला व विधिमंडळ व कार्यकारी मंडळ यानी केलेल्या कायद्याचे आकलन करून जर संविधानाच्या ध्येयानुरूप नसतील तर शून्यवत करण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे जर न्यायपालिका सामाजिक भान ठेऊन कार्य केले असते तर आज देशाचे चित्र बदलले असते.याहीपलीकडे जाऊन ते म्हणाले जो समाज पैसा,श्रम व वेळ योग्य दिशेने वापर करीत नाही तो आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही '' तसेच श्रीमती कोवा लक्ष्मी आमदार, कुमारभीम असिफाबाद म्हणाल्या,``मी आज आज राजकीय क्षेत्रात आमदार आहे ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच.अनुचित जाती,जमाती व संपूर्ण भारतीयांना प्रगतीच्या प्रवाहात आणन्याची तरतूद संविधानात डॉ. बाबासाहेबानी केली त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक क्रांतीचे प्रतीक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते करण्याची संधी गोयेगावच्या जनतेनी मला दिली,त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.`` याप्रसंगी विचारमंचावर मा.शिवदास महाजन, निवृत्त न्यायाधीश,पुणे, श्रीराम ढोक, पुणे,प्रदीप. फुलझेले,कामठी नागपूर,
ॲड.डॉ.मधुकर कोटनाके,राजुरा,
,दिलीप नेवसे पाटील, नायगाव, सातारा, नागनाथ डोलारे, पनवेल, श्रीमती गायत्री रामटेके, बल्लारपूर,दीपक ओंकार,गोल्डमॅन किनवट तथा मधू बावलकर,साहित्यिक
आदिलाबाद तसेच तेलंगाणा,बौद्ध मंडळाचे अध्यक्ष तारू नगराळे, दत्तू ताकसांडे, एम. शंकर, टी.आनंदराव उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन सर यांनी केले व कार्यक्रमास महाराष्ट्रातील व तेलंगणातील मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "जो समाज पैसा, श्रम व वेळ योग्य दिशेने वापर करीत नाही तो आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही..ॲड.डॉ.सत्यपाल कातकर.."
एक टिप्पणी भेजें