-->
सणोत्सवादरम्यान सुव्यवस्था अबाधित राखा..

सणोत्सवादरम्यान सुव्यवस्था अबाधित राखा..

• भंडारा जिल्हास्तरीय शांतता समितीचे आवाहन.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क 

भंडारा :- शहरात आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा, या उद्देशाने सुरक्षेसाठी विशेष भरारी पथकांची स्थापना.

शनिवारी भंडारा येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठक भंडारा पोलिस मुख्यालय येथील पोलिस क्राईम मीटिंग हॉल येथे अत्यंत शांततेत संपन्न झाली. भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन, प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जाधव, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच जिल्ह्यातील विविध धर्म आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सर्व सदस्य आणि लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, आगामी ईदचा सण सर्व नागरिकांनी नेहमीप्रमाणे शांततेत, उत्साहात आणि पारंपरिक बंधुभावाने साजरा करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक

सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवता यावे, यासाठी भंडारा पोलिसांकडून संपूर्ण जिल्ह्यात विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही भरारी पथके जिल्ह्यात सतत गस्त घालणार असून, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना त्वरित नियंत्रणात मिळवण्यासाठी आणि संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी ती सज्ज राहतील, असे करण्यात आले. आवाहन प्रशासनातर्फे

नूरुल हसन यांनी केले. सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी याकामी पोलिसांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पसरणाऱ्या खोट्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये .

0 Response to "सणोत्सवादरम्यान सुव्यवस्था अबाधित राखा.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article