-->
मुलाने केली अपंग बापाची फावड्याने निघृण हत्या ! पुतण्या गंभीर जखमी.

मुलाने केली अपंग बापाची फावड्याने निघृण हत्या ! पुतण्या गंभीर जखमी.


• तुमसर तालुक्यातील खरबी येथील रक्तरंजित थरारक घटना.

 • घरगुती वादातून रक्ताचं नातं काळवंडलं, आरोपी मुलाला मोहाडी पोलीसांनी केली अटक.
.            आरोपी.                           मूतक

      दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर/मोहाळी :- तालुक्यातील खरबी गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक रक्तरंजित थरारक घटना घडली. घरगुती वादातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोटच्या मुलाने आपल्याच अपंग वृद्ध पित्याच्या डोक्यावर फावड्याने सपासप वार करून निघृण हत्या केल्याची घटना. २९ मे रोजी रात्री १० वाजता दरम्यान घडली. तुकडू लहाणू बावणे (६५) रा. खरबी ता. तुमसर असे मृतक बापाचे नाव आहे. तर भांडणात मध्यस्थी करायला गेलेला जखमी आर्यन आनंद बावणे (१५) याला उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गणेश उर्फ सोनु तुकडु बावणे

(२७) असे आरोपीचे नाव आहे. मृतक तुकडू बावणे आणि मुलगा गणेश उर्फ सोनू मृतक तुकडू बावणे हे दोघे खरबी येथे एकत्र राहत होते. शुक्रवारी रात्री दोघेही घरी असताना बाप वआरोपी मुलात संडास बाथरुम लवकर बांधकाम करुन देण्याच्या कारणावरून दोघात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की,

मद्यपानाच्या नशेत असलेल्या गणेशने रागाच्या भरात घराच्या कामासाठी आरोपी वापरले जाणारा लोंखडी फावडा उचलला आणि आपल्याच अपंग पित्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात वडील तुकडू बावणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोठ्या भावाचा मुलगा आर्यन बावणे (पुतण्या) हा मध्यस्थी

करायला गेला असता त्याला सुध्दा थापड बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. आपल्या जन्मदात्या पित्याचा निघृण खून केल्यानंतर आरोपी गणेशने घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल होत आरोपी गणेशला अटक केली.

घटनेची माहिती होताच घटनास्थळी गावातील नागरिकांनी मृतकाच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. रक्त रंजित थराराक घटनेने संपूर्ण गाव हादरले होते.

आरोपी गणेश बावणे हा विवाहित असून त्याला पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मृतक तुकडू बावणे हा आरोपी मुलगा गणेश सोबत राहत होता. तर मृतकाची पत्नी दुसऱ्या मुलाकडे वास्तव्यास होती

अशी माहिती समोर आली आहे. एकाच छताखाली राहणाऱ्या मुलाने बापाचाच मुडदा पाडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर घटनास्थळाला पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस विलास काळे यांनी भेट दिली तर सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत. मोहाडी पोलिसांनी आरोपी गणेश बावणे याला विविध कलमान्वे व खुणाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

0 Response to "मुलाने केली अपंग बापाची फावड्याने निघृण हत्या ! पुतण्या गंभीर जखमी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article