-->
मांजरा नदी पात्रात हायवाचा धुमाकूळ!.

मांजरा नदी पात्रात हायवाचा धुमाकूळ!.

 
• रात्रीचे १० वाजले तरी अवैध वाळू उपसा जोरात!

     विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज़"  

नांदेड :- शासन-प्रशासनाचा धाक संपलाय का? की अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
बिलोली तालुक्यातील पाच ते सहा जेसीबी च्या सहाय्याने मांजरा नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा राजरोसपणे सुरू आहे.

 अवाढव्य 'हायवा'दिवसा ढवळ्या वाहतुक करत रस्त्यावर धावत आहेत गाड्यांच्या ये-जा करणाऱ्या फेऱ्यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून, नांदेड तालुक्यातील नदी घाटावर वाळू उपसा जोमात सुरू आहे, तहसीलदार, पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत आहे,स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ गंभीर कारवाई करणे गरजेचे आहे.घरकुल लाभधारक वेळोवेळी तहसीलदार यांना मागणी करुनही त्यांना वाळु मिळत नाही हे दुर्दैव आहे.
पर्यावरणाची होणारी ही लूट आणि रात्रीचा हा धुमाकूळ कधी थांबणार? संबंधित महसू प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही? पथक कार्यवाही करणार का?.पाच ते सहा जेसीबी च्या साह्याने नदीची लुट ,

0 Response to "मांजरा नदी पात्रात हायवाचा धुमाकूळ!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article