-->
नामस्मरण हेच जीवनाचे खरे सार आहे...!!

नामस्मरण हेच जीवनाचे खरे सार आहे...!!

                     हर्षवर्धन देशभ्रतार 
                     संकलन/संग्रहक

भंडारा/तुमसर :- रामभाऊ आवारे, निफाड, मानव जीवनाला खरे अर्थपूर्ण, शुद्ध आणि मुक्त करणारे जे काही आहे, त्याचा मूलमंत्र म्हणजे नामस्मरण. महानुभाव पंथाचे संस्थापक, साधनदाता प्रभू सर्वज्ञ श्रीचक्रधर महाराज यांनी आपल्या उपदेशा-तून, आचारातून आणि वचनातून नामस्मरणाचे अती उच्च महत्त्व स्पष्ट केले आहे. संसाराच्या गुंत्यात अडकलेल्या जीवाला मुक्तीकडे नेण-ारा हा सोपा, सरळ आणि सर्वांना खुला मार्ग आहे. मानव जन्म हा दुर्मिळ आहे. हा जन्म केवळ भोगासाठी नसून आत्मोद्धारासाठी आहे. धन, पद, मान, प्रतिष्ठा हे सर्व क्षणभंगुर आहे. मृत्यूसोबत काहीही सोबत जात नाही; मात्र नामस्मरणाने शुद्ध झालेली चेतना हीच आत्म्याची खरी संपत्ती ठरते. श्रीचक्रधर महाराजांनी याच कारणासाठी कर्मकांडांपेक्षा अंतः

.              महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव

करणशुद्धीवर आणि नामस्मरणावर अधिक भर दिला. नामस्मरण म्हणजे केवळ ओठांनी नाम उच्चारणे नव्हे, तर मन, वाणी आणि कृती यांचा एकरूप होऊन परमेश्वराशी जोड निर्माण करणे होय. सततच्या नामस्मरणाने मनाची चंचलता कमी होते, अहंकार गलित होतो आणि वैराग्याची भावना दृढ होते. महानुभाव पंथात सांगितलेले नित्य नामस्मरण हे साधनेचे मुख्य अंग आहे. श्रीचक्रधर प्रभूच्या शिकवणीत साध 'पणा हेच खरे वैभव मानले आहे. जात-पात, उच्च नीच, स्त्री-पुरुष असा भेद न करता प्रत्येकाला नामस्मरणाचा अधिकार आहे. जो नाम घेतो, तोच खरा साधक ही भावना महानुभाव तत्त्वज्ञानाचा कणा आहे. त्यामुळे नामस्मरण हा सर्वसामान्य माणसालाही मुक्तीच्या मार्गावर नेण ारा साधा उपाय ठरतो. महानुभाव पंथ संसारत्यागापेक्षा आसक्ती त्याग शिकवतो. संसारात राहून कर्तव्ये पार

पाडतांना मन नामात ठेवले, तरच खरा योग साधतो. श्रीचक्रधर महाराजांनी सांगितलेला हा मार्ग आजच्या धावपळीच्या जीवनात अधिकच उपयुक्त ठरतो. नामस्मरणामुळे दुःखात धैर्य, संकटात स्थैर्य आणि सुखात संयम प्राप्त होतो. निरंतर नामस्मरण केल्याने अंतःकरण निर्मळ होते, विवेक जागृत होतो आणि आत्मज्ञानाची वाट खुली होते. हळूहळू जीवाला संसारबंधन शिथिल झाल्याची जाणीव होते. हाच मोक्षमार्गाचा प्रारंभ आहे. म्हणूनच महानुभाव पंथात नामस्मरणाला सर्व साधनांचा राजा मानले आहे. नामस्मरण हेच जीवनाचे खरे सार आहे, कारण तेच जीवनाला दिशा देते, शांती देते आणि अंतिम मुक्तीकडे नेते. साधनदा-ता प्रभू श्रीचक्रधर महाराज यांच्या शिकवणीनुसार, नामात रमलेले जीवन हेच खरे धन्य जीवन आहे. रोजच्या जगण्यात नामाला स्थान दिले, तर जीवन निश्चितच पवित्र, संतुलित आणि सार्थक होईल.

         दंडवत... 

महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव,
        उरळी कांचन पुणे.

0 Response to "नामस्मरण हेच जीवनाचे खरे सार आहे...!!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article