-->
महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरवादी समाजाचा एल्गार.

महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरवादी समाजाचा एल्गार.

.                मोर्चात अनेक नेते व कार्यकर्ते 

• जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा; अ, ब, क, ड उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी.

साप्ताहिक जनता की आवाज"
      वृत्तपत्र प्रतिनिधी 

बीड :- महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा घेतलेला निर्णय हा समाजात फूट पाडणारा असून जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत बीड जिल्ह्यातील आंबेडकरवादी समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले,

अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करा, संविधान वाचवा, आरक्षणावर घाला चालणार नाही, एकच झंड़ा आंबेडकरवादी ऐक्य अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. जिल्ह्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या हजारो

समाजबांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. नगर रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी बौद्ध, चांभार, ढोर, होलार यांसह विविध मागासवर्गीय समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी आले होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती, निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि घोषणांनी

परिसर आंबेडकरमय झाला होता. मोर्चादरम्यान विविध वक्त्यांनी शासनाच्या

भूमिकेवर जोरदार टीका केली. राजकीय स्वार्थासाठी समाजात भांडणे लावण्याचा हा डाव आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानिक आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज कधीही हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा वक्त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत प्रत्येक समाजघटकाच्या प्रतिनिधींना आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. सर्व वक्त्यांनी एकमुखाने उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शवत शासनाने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. यानंतर पाच पुरुष व पाच महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले, शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्वरित निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

0 Response to "महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरवादी समाजाचा एल्गार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article