-->
८०० वर्षापूर्वी श्रीचक्रधर स्वामींनी केली समतापर्वाची सुरुवातः प्रा. संदिप तडस.

८०० वर्षापूर्वी श्रीचक्रधर स्वामींनी केली समतापर्वाची सुरुवातः प्रा. संदिप तडस.

.               व्यासपीठावर आचार्य व महंतगण

"साप्ताहिक जनता की आवाज"
        वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- तळोधी महाराष्ट्रात संविधानिक मुल्ये रुजविण्याची सुरुवात संतपरंपरेने केली असून महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही अगोदर सुमारे ९०० वर्षांपूर्वी महानुभाव धर्मप्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व हक्क ई. मानवी मुल्यांचा पुरस्कार करून जणमाणसात रुजवण्यासाठी

चनि

प्रयत्न केले, त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतापर्वाची खरी सुरुवात ८०० वर्षांपूर्वीच सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी केली, त्यामुळे श्रीचक्रधर स्वामी त्या

काळातले महात्मा फुले होते, डॉ. आंबेडकर होते असं म्हणायला काहीही हरकत नाही, असे प्रतिपादन

महानुभाव साहित्य व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. संदिप तडस, अमरावती यांनी केले.

श्रीदत्त मंदिर पंच कमेटी चक (चारगाव), सर्वज्ञ श्रीचक्रधर

'महानुभाव पंथ व भारतीय संविधानिक मुल्ये' या विषयावर व्याख्यान

स्वामी विचारमंच तळोधी (बा) व राजधर कारंजेकर सेवा समिती तळोधी (बा) यांच्या विद्यमाने ८ व्या वर्धापनदिनानिमित्त 'महा नुभाव पंथातील सामाजिक वैज्ञानिक दृष्टिकोण व भारतीय संविधानिक मुल्ये' या विषयावर विशेष व्याख्यान नागभिड तालुक्यातील श्रीचक्रधर स्वामी मंदिर, चक (चारगाव) येथे संपन्न झाले, त्यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्रातील संत परंपरेचा वारसा घेऊनच भारतीय राज्यघटनेत मानवी मुल्यांचा अंतर्भाव करण्यात आला असेही ते म्हणाले. यावेळी या युवा प्रबोधन व व्याख्यान सत्राचे अध्यक्ष विद्वतरत्न पू. म. नीतिनराज बांधकर यांनी वर्तमान काळात संविधानिक मुल्ये जणमाणसात रूजवण्या साठी आवश्यक ते सर्व प्रयत्न वर्तमान संतपरंपरेने करावे असे विचार व्यक्त केले.

0 Response to "८०० वर्षापूर्वी श्रीचक्रधर स्वामींनी केली समतापर्वाची सुरुवातः प्रा. संदिप तडस."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article