-->
तुमसर पंचायत समितीमध्ये पालकांचा तीव्र संताप.

तुमसर पंचायत समितीमध्ये पालकांचा तीव्र संताप.

निष्क्रिय प्रभारी गट शिक्षणाधिकारी अर्चना माटे यांच्या खुर्चीवर हार घालून निषेध !.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आणि प्रभारी गट शिक्षणाधिकारी अर्चना माटे यांच्या कथित अकार्यक्षम व निष्क्रिय कार भाराविरोधात शुक्रवारी संतप्त पीडित पालकांनी थेट पंचायत समिती गाठून तीव्र आंदोलन केले. वारंवार तक्रारी करूनही दाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी थेट गट शिक्षणा-

धिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून त्यांच्या कार्यपद्धतीचा अनोखा आणि तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या मागण्यांसाठी आलेल्या पालकांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित न दिसल्याने त्यांच्या संतापाचा बांध तुटला. शिक्षण विभागाच्या या 'आंधळ्या आणि बहिऱ्या' कारभाराचा निषेध करण्यासाठी पालकांनी थेट प्रभारी गट शिक्षणाधिकारी अर्चना माटे यांच्या

शासकीय खुर्चीवर पुष्पहार अर्पण केला. स्काम करू शकत नसाल तर खुर्ची सोडा, ₹ अशा भावना यावेळी संतप्त पालकांनी व्यक्त केल्या. यावेळी स्वराज्य युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, लंकेश तिजारे, पुरुषोत्तम ढबाले, विठ्ठल डहाळे, कैलाश राऊत, शुभम ठवकर, समीर ठवकर, महेश डायरे, कोमल बोदरे, अमर कांबळे, सुधाकर सहारे, महेंद्र मेश्राम, राहुल पुडके, भरत तिजारे उपस्थित होते.

या आंदोलनादरम्यान पालकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे

जिल्हाधिकारी, भंडारा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी. जर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आगामी काळात संपूर्ण तुमसर तालुक्यात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.₹

 अमित मेश्राम

आमच्या मुलांच्या भविष्याशी आणि शैक्षणिक हक्काशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न घेऊन आम्ही वारंवार शिक्षण विभागात येत आहोत. मात्र, प्रभारी गट शिक्षणाधिकारी अर्चना माटे या सतत गैरहजर किंवा उदासीन असतात. अधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असून, आमच्या तक्रारींची साधी दखलही घेतली जात नाही. हा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा घोर अपमान आहे. ₹

 पुरुषोत्तम ढबाले, पीडित पालक

की, अकार्यक्षम प्रभारी गट शिक्षणा-धिकारी अर्चना माटे यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तुमसर पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभारानंतर आता जिल्हा प्रशासन यावर काय पावले उचलते आणि संबंधित निष्क्रिय अधिका-प्ऱ्यावर कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0 Response to "तुमसर पंचायत समितीमध्ये पालकांचा तीव्र संताप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article