यावर्षीचा मे महिना ठरला ११४ वर्षांनंतरचा पहिला उष्म महिना.
शनिवार, 30 मई 2026
Comment
• राज्यातील १६ जिल्हे तापले.
दिगंबर देशभ्रतार (वि.वृ.प्र.)
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- यावर्षीचा मे महिना मागील ११४ वर्षांतील सर्वांत उष्म महिना ठरला आहे. राज्य शासनाच्या गॅझिटिअरच्या अधिकृत नोंदीनुसार १६ मे १९१२ रोजी राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४८.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे तापमान २४ मे २०२६ रोजी ४७.६ अंश नोंदविले गेले. अद्यापही तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वरच राहात आहे. जोडीलाच राज्यातील १६ जिल्हेही तापमानाचा उच्चांक नोंदवत आहे. राज्यात तापमानाच्या चढत्या कमानीबाबत हवामान खात्याचे दररोजच इशारे येत आहेत. पुढील पाच दिवस तापमान रीस कमी होण्याची शक्यता नाही, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती तसेच वर्धा, हे जिल्हे दररोजच तापमानाचा उच्चांक नोंदवित आहेत. या जिल्ह्यात दररोजच रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट हवामान खात्याच्या वतीने दिला जातो. मागील १०० वर्षांचा तापमानाचा ३६ जिल्ह्यांचा ताळेबंद तपासला असता, मार्च ते मे महिना या तीन महिन्यात मे महिना सर्वांत उष्ण ठरला आहे. राज्यातील तापमानाचा पारा फक्त एकदाच ४८ अंशावर गेला आहे. यावर्षी मात्र सलग आठवड्यापासून वर्धा, ब्रह्मपुरी, अकोला, अमरावतीचे तापमान सतत ४६ ते ४७ अंशाच्या आसपास राहात आहे. २४ मे २०२६ रोजी ब्रह्मपुरीचे तापमान ४७.६ अंशावर गेले होते. हे ११४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले होते. वर्धा ४७. १ अंशावर होते. २७मे २०२४ रोजी ब्रह्मपुरीचे तापमान ४७.६ अंशावर गेले.
मित हेत. चाव, थेट संसर्ग सरत तका से या यात
तींचे च्छता बंधक करणे, थापन तसेच टाळून याचे टरांना देशात किंवा पराचा ही.
होते. ही तापमानाची दुसऱ्या क्रमांकाची नोंद होती. त्याचवेळी २७ मे २०२४ रोजी तापमान वर्ध्याचे तापमान ४७.१ अंशावर गेले होते. ही तापमानाची तिसऱ्या क्रमांकाची नोंद होती. १६ मे १९१२ रोजी चंद्रपूरचे तापमान ४८.३ अंशावर गेले होते. हा तापमानाचा ११४ वर्षांपूर्वीचा उच्चांक होता. त्यानंतर यावर्षीचा मे महिना सर्वांत उष्ण महिना ठरला आहे. राज्यातील सर्वांत उष्म जिल्ह्यात विदर्भातील भंडारा,गोदिंया, वर्धा, अकोला, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान ४५ ते ४७.६ अंश, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील तापमान ३८ ते ४३ अंशादरम्यान राहिल्याची नोंद झाली. मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, नांदेड जिल्ह्यातील तापमान ४१ ते ४४ अंशादरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच धुळे जिल्ह्यातील तापमान ४३ ते ४४ अंशादरम्यान नोंदविले जात आहे. कोकणातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांची राज्यातील उष्म जिल्ह्यात नोंद झाली आहे.
0 Response to "यावर्षीचा मे महिना ठरला ११४ वर्षांनंतरचा पहिला उष्म महिना."
एक टिप्पणी भेजें