सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा.
शुक्रवार, 29 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवनेरी फाउंडेशन चे अध्यक्ष रवींद्र मिंडे तसेच सदस्य भास्कर गाडे यांचा वाढदिवस दिनांक २५ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वाढदिवस सोहळ्यास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी शिवनेरी फाउंडेशन चे सचिव ॲड. प्रशांत चंदनशिव, सदस्य अरविंद खरात व वीर उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघ चे उल्हासनगर पदाधिकारी सुधीर कान्हेरे, मुकुंद सांगडे आणि अण्णासाहेब खतोडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रवींद्र मिंडे आणि भास्कर गाडे यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यातही समाजकार्यात सक्रिय राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
0 Response to "सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा."
एक टिप्पणी भेजें