विषारी दारू दुर्घटनेनंतर पोलिस सक्रिय अवैध हातभट्ट्यांवर धडक कारवाई.
रविवार, 31 मई 2026
Comment
• ७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
साकोली :- पुणे येथील विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर साकोली पोलिस सतर्क झाले असून, त्यांनी अवैध हातभट्ट्यांविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पहाटेपासून विविध ठिकाणी छापेमारी करत ७आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३ लाख २४ हजार १५१ रुपयांचा अवैध दारूसाठा आणि साहित्य जप्त करण्यात आले.
अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये, या उद्देशाने पोलिस अधीक्षक नुरूल हसन आणि अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार साकोली पोलिसांनी विशेष मोहीम आखली. साकोली ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. पहाटे ५.३० वाजता या पथकांनी जंगल आणि शेतशिवारातील अवैध अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले. पोलिसांनी या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्या उद्धवस्त करून मोहाफुलापासून तयार करण्यात येणारी दारू, कच्चे साहित्य आणि इतर उपकरणे जागीच नष्ट केली. या धडक कारवाईमुळे अवैध दारूनिर्मिती करणाऱ्यांमध्ये प्रचंड
विविध ठिकाणांहून मुद्देमाल केला जप्त
साकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार प्रमुख ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आली. यात एकोडी जंगल परिसरातून २१ ५०० हजार रुपयांचा मुद्द माल सानगडी शेतशिवारातून १ लाख ३५ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल, गोंडउमरी जंगल शिवारातून १७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल, जांभळी/सडक शेतशिवारातून १ लाख ४९ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खळबळ उडाली.
पोलिस प्रशासनाचा इशारा साकोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. पुणे येथील दुर्दैवी घटनेनंतर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक
कारवाई केली. आगामी काळातही अवैध दारू व्यवसायांविरुद्ध अशाच प्रकारे सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस विभागाने स्पष्ट केले असून, अवैध धंदे करणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला. या मोहिमेमुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला.
0 Response to "विषारी दारू दुर्घटनेनंतर पोलिस सक्रिय अवैध हातभट्ट्यांवर धडक कारवाई."
एक टिप्पणी भेजें