-->
भंडारा विधानसभा अध्यक्ष पदी नाशिक चवरे यांची निवड.

भंडारा विधानसभा अध्यक्ष पदी नाशिक चवरे यांची निवड.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक विश्रामगृह भंडारा येथे हेमंत घोडीचोर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व संजय भिवगडे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र प्रभारी , दिलीप मोटघरे जिल्हा उपाध्यक्ष , अमित रामटेके जिल्हा सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत व बहुसंख्या ब.स.पा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीत भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन येथील सामाजिक कार्यकर्ते नाशिक चवरे यांची बहुजन समाज पार्टी भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या विधानसभा कमेटीमध्ये विधानसभा प्रभारी डॉ. भैयालाल मेश्राम , कोषाध्यक्ष नेमीचंद बागडे , सचिव मयूर खोब्रागडे व बहुजन समाज पार्टी भंडारा तालुका अध्यक्ष राहुल साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष हेमंत घोडीचोर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी ब.स.पा च्या वतीने स्वागत व अभिनंदन केले. व पक्षाचे ध्येय, धोरण व संघटनात्मक बाबींवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष हेमंत घोडीचोर , लोकसभा प्रभारी संजय भिवगडे , जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटघरे , पूर्व प्रभारी नामदेव ठाकरे , पूर्व प्रभारी के. एल. गजभिये , पूर्व महाराष्ट्र सचिव तुळशीराम शेंडे , अमित रामटेके , पूर्व जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द मोटघरे , रवी गजभिये, रंजीत नंदागवळी , प्रा. बबन नगरारे, प्रफुल रामटेके , रवी भवसागर , संजय रामटेके , राजकुमार खोब्रागडे व बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

0 Response to "भंडारा विधानसभा अध्यक्ष पदी नाशिक चवरे यांची निवड."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article