-->
जिल्हा पोलीस दलात बदलीचे वारे!..

जिल्हा पोलीस दलात बदलीचे वारे!..

• 'वशिलामुक्त' प्रक्रियेची चर्चा रंगली

• दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा/तुमसर :- जिल्हा पोलिस दलातील सन २०२६ च्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागात सध्या अंतर्गत हालचालींना वेग आला असून, यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शक, निकषाधारित आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्याबाबत प्रशासन गंभीर असल्याची चर्चा पोलिस वतुर्कात रंगू लागली आहे.
 विशेष म्हणजे, बदल्यांमध्ये राजकीय शिफारसी, फोनाफोनी, वशिला संस्कृती आणि बाह्य हस्तक्षेपाला आळा घालण्यावर प्रशासनाचा भर राहू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे.

दरवर्षी बदल्यांचा हंगाम सुरू होताच इच्छित ठिकाणी नियुक्तीसाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू होत असल्याचे बोलले जाते. काही कर्मचारी राजकीय तसेच प्रशासकीय संपर्क वाढवून अनुकूल ठिकाणी बदली मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, यंदा संपूर्ण प्रक्रिया खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत विभागीय स्तरावर चर्चा सुरू असल्याने

अनेकांचे लक्ष या बदल्यांकडे लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी सलग पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले कर्मचारी, तसेच एकाच तालुक्यात विविध शाखा किंवा विभागांमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा बदल्यांसाठी प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या मूळ गावात किंवा गृहतालुक्यात होऊ नये, याकडेही प्रशासन विशेष लक्ष देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बदल्या रखडल्याने कार्यपद्धतीवर परिणाम

दरम्यान, काही विभागांमध्ये दीर्घकाळ बदल्या रखडल्याने कार्यपद्धतीवर परिणाम होत असल्याची भावना पोलिस दलात व्यक्त होत असून, कार्यक्षम आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून निकषाधारित प्रक्रियेची अपेक्षा व्यक्त केली

३० तारखेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्याबाहेर पाठविण्याची कोणतीही तरतूद नाही. तालुकास्तरावर किंवा अंतर्गत बदल्या पारदर्शक पद्धतीने केल्या जातील. संबंधित कर्मचा? यांना स्क्रीनवर माहिती दाखवून त्यांच्या स्वेच्छेनुसार पर्याय देण्यात येतील. संपूर्ण प्रक्रिया निकषाधारित आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येईल.

- नुरुल हसन, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

जात आहे. कर्मचा? यांना पसंतीक्रम देण्याची संधी मिळू शकते, मात्र अंतिम निर्णय हा रिक्त पदे, प्रशासकीय गरज आणि सेवाविषयक निकषांच्या आधारेच घेतला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, काही कर्मचाऱ्यांकडून विविध स्तरांवर फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. मात्र, कोणताही बाह्य दबाव किंवा अनधिकृत हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश अंतर्गत स्तरावर देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

0 Response to "जिल्हा पोलीस दलात बदलीचे वारे!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article