-->
चर्मकार आरक्षणाचे उपवर्गीकरण समाज हाणून पाडणार.

चर्मकार आरक्षणाचे उपवर्गीकरण समाज हाणून पाडणार.



 • आळंदी येथील राज्यव्यापी महाबैठकीत बबनराव घोलप, डॉ. बाबा कांबळे, बाबुराव माने, संजय खामकर, डॉ. ऊर्मिला ठाकरे यांची आरपारच्या लढ्याची हाक.
"साप्ताहिक जनता की आवाज" 
     न्यूज नेटवर्क 

भंडारा :- अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे 'अ-ब-क-ड' उपवर्गीकरण करण्याचा डाव चर्मकार समाज एकजुटीने पूर्णपणे हाणून पाडणार, असा एकमुखी निर्धार श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे व्यक्त करण्यात आला. 'समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा' संस्थान येथे संस्थेच्या वतीने व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजाची राज्यव्यापी ऐतिहासिक महाबैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष व समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांची यांनी भूषवले, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही ऐतिहासिक बैठक पार पडली, लवकरच मुंबई येथे राज्यवापी आंदोलन उभारले जाईल, असे घोषणा, यावेळी बबनराव घोलप यांनी केले, माजी आमदार बाबुराव माने यांनी चर्मकार समाजाने आंबेडकरी समाजासमवेत या लढचात पुढाकार घेण्याची महत्त्वाची भूमिका मांडली. संविधानाने दिलेले हक आणि आरक्षण वाचवण्यासाठी चर्मकार समाजाने आंबेडकरी समाजाच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात पुढाकार घेतला पाहिजे. असे संजय खामकर यांनी सांगितले. महारामध्ये चर्मकार समाजाची

मोठी संख्या आहे. चर्मकार समाजावर अन्याय होऊ देणार नाही. चर्मकार समाजाची लोकसंख्या कमी दाखवून आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे ठाम मत धन्य मांडले. डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केले. उपवर्गीकरण विरोधातील या भूमिकेमुळे शासनाला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडावे लागेल, असे मत मुख्य वक्ता राहुल उंबाळे यांनी व्यक्त केले. तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी च्या नेत्या तथा राष्ट्रीय सल्लागार डॉ. ऊर्मिलाताई ठाकरे म्हणाल्या की, उपवर्गीकरण होवू नये म्हणून संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल व सरकारच्या विरुद्ध प्रचंड मोठा आक्रोश मोर्चा काढू आणि मागासवर्गी यांच्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडू, असे त्यांनी प्रतिपादन केले. बैठकीत मंजूर करण्यात आलेले महत्त्वपूर्ण ठरावः १) आरक्षण उपवर्गीकरणास तीव्र विरोधः अनुसूचित जातीच्या आरक्षणात अंतर्गत विभागणी करून समाजाची ताकद कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न चर्मकार समाज सहन करणार नाही. हा डाव रस्त्यावर उतरून हात

पाडण्याचा संकल्प समाज के ला बांधवांनी आहे. २) जनगणनेतील त्रुटींवर कारवाईची मागणीः शासकीय जनगणनेमध्ये चर्मकार समाजाची लोकसंख्या तब्बल ६० टक्‌यांनी कमी दाखवून अन्याय केला गेला आहे. हे गंभीर षडयंत्र रचणाऱ्या आणि चुकीची आकडेवारी आहे. ४) सरकारने ज्याप्रमाणे टी.व्ही वर रामायण दाखवले त्याप्रमाणे संविधान सुद्धा टी. व्ही. वर दाखवावे व समाजाला नोंदवणाऱ्या दोषी यंत्रणेवर व अधिकाऱ्यांवर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ३) आंबेडकरी आंदोलनांना पाठिंबाः संविधानाने दिलेले हक आणि आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व आंबेडकरी चळवळी व आंदोलनांना चर्मकार समाजाने आपला अधिकृत व जाहीर पाठिंबा दिला सजग करावे. यामाध्यमातून जनतेला आपल्या मूलभूत अधिकाराची जाणीव होईल. आपल्या हकासाठी ते पेटून उठतील. ५) मुंबईत धडकणार विराट आंदोलनः आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शासनाला जागे करण्यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील सकल चर्मकार

श्रीक्षेत्र आळंदी देवाच

ऐतिहासिक आंदोलन करून आक्रोश करणार आहेत. यावेळी बैठकीचे अध्यक्ष मा समाज कल्याण मंत्री ज्येष्ठ नेते बबनरावजी घोलप, माजी आमदार बाबुराव माने, भाऊसाहेब कांबळे, भारतीय धर्मसंघटक राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी वाघमारे, कष्टकऱ्यांचे नेते, डॉ. बाबा कांबळे, आंबेडकरी चळवळीतील नेते राहुल उंबाळे, चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर, चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ग्राहक कल्याण समिती महामंडळाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळे, राष्ट्रीय चर्मकार संघ प्रदेश अध्यक्ष शांताराम कारंडे, महिला आघाडीच्या नेत्या डॉ. उर्मिला ठाकरे, स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष सुरेश पोटे, राजू बनसोडे, अरुण माने, आनंद गवळी, ऍड. नारायण गायकवाड, विजय घासे, अंकुश आंबेकर, दिनेश जाधव, रवींद्र खैरे, संतोष टोनपे, जयदेव इसवे, सुदामा लोखंडे, दत्तात्रेय गोतीचे, अनिल कानडे, गजानन निंबोरे, सुभाष सोनवणे, राम कदम, रुक्मणी ननवरे यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. बाबा कांबळे यांनी केले, तर विषयाची प्रस्तावना संजय खामकर यांनी मांडली. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान चे कार्याध्यक्ष अनिल सातपुते, सचिव बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष सुखदेव सूर्यवंशी, विश्वस्त, श्रीभाऊ काळे, तुषार नेटके, दत्तात्रय शिंदे, मधुराताई डांगे, सुरेखा सुर्वे, व्यवस्थापक व पुजारी, नारायण गाडेकर, संदिपान महाराज घायाळ, सुदाम कांबळे, संतोष वाघमारे, सागर भोसले आणि सुनील कदम, यांनी केले. आमार तुषार (बाळ) नेटके यांनी मानले, अमोल वाघमारे यांनी प्रस्ताव, मांडला प्रस्तावाला अनुमोदन अनिल सातपते यांनी दिले.

0 Response to "चर्मकार आरक्षणाचे उपवर्गीकरण समाज हाणून पाडणार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article