-->
केशोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर.

केशोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर.

• विविध महसूल सेवांचा नागरिकांची घेतला लाभ.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

अर्जुनी मोरगाव :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा-१ अंतर्गत अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयाच्या वतीने केशोरी महसूल मंडळात विशेष महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दि. १५ मे २०२६ रोजी डॉ. राधाकृष्ण हायस्कूल कनेरी/केशोरी येथे संपन्न झाले.

या समाधान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत अपर जिल्हाधिकारी कुंडलिकराव लोथे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रशासक नंदकुमार गहाणे, जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे, माजी जि प सभापती प्रकाश गहाणे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक मंगेश काळे, नायब तहसीलदार खुशाल कावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद उंदीरवाडे, केशोरीचे मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे, मंडळातील सर्व सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

होते. तर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत अनेक शासकीय योजनेची माहिती दिली. या विशेष शिबिरात नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा, आरोग्य, कृषि, पुरवठा, वन, महावितरण, पशुसंवर्धन, आधार केंद्र, सेतु, भूमिअभिलेख, संगायो, उमेद यासह विविध विभागानी स्टॉल लावुन शासकीय योजनेची माहिती व योजनेचे लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले होते. यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८ अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषक तक्रारींबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती यांचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांसाठी

अभियानाची दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभमंजुरी, तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचा निपटारा, घरासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, आरोग्य तपासणी, राशन कार्ड, आधार कार्ड अपडेट व पीएम किसान योजना, पोलीस विभागाची वाहतुक सुरक्षा माहिती, वनविभागाची वन्यप्राणी व मानव संघर्ष जनजागृती व वनविभागाच्या योजनाची माहिती तसेच भूमिसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांची सुनावणी करण्यात आली. तहसील प्रशासनाने राबविलेल्या या विशेष समाधान शिबिराचा केशोरी महसूल मंडळातील अनेक नागरिक, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी लाभघेतला त्यामुळे या समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

0 Response to "केशोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article