श्रीकृष्ण मंदिर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीकृष्ण कथेचे आयोजन.
शनिवार, 16 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/तुमसर :- द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर माताखिडकी (बुधवारा) अमरावती येथे, अमरावती महानुभाव वासानिक सेवा मंडळाच्यावतीने पुरूषोत्तम मास (अधिकमास) निमित्त श्री कृष्ण कथा प्रवचन सोहळ्याचे आयोजन सोमवार १८ मे २०२६ ते रविवार २४ मे २०२६ पर्यंत करण्यात आले आहे. श्रीकृष्ण कथेचे निरूपण दररोज सायंकाळी ६ ते ८. ३० वाजेपर्यंत राहील.
या वेळेत सिन्नर जि. नासीक निवासी कृष्णकथाव्यास म. श्री. मानसशास्त्री बाबा महानुभाव यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्री कृष्ण कथा निरूपण करण्यात येईल. प. पु. बाबांची संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी सतत प्रवचने व संगीतमय श्री कृष्ण कथा कार्यक्रम होत असतात. या प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवार १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत, सचिव अॅड.
अरुण ठाकरे, कोषाध्यक्ष इंजि. एस. पी. देशमुख, मंडळाचे अध्यक्ष बाबुराव बोराळकर यांच्या हस्ते सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. या कृष्ण कथेमध्ये महात्म्य, कृष्ण स्तुती, श्रीकृष्ण जन्म सोहळा, बाललीळा, गोपी गीत, कंसचानूर मर्दनम, द्वारका गमन, श्री कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा, कृष्ण तुला, महाभारत प्रसंग, सुदामा भेट, श्रीमद्भगवद्गीता निरूपण, असे अनेक प्रसंग या कथेत प्रस्तुत करण्यात येईल.
या सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम रविवार २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता घेण्याचे ठरले आहे. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प. पू. प. म. आचार्यप्रवर कारंजेकर बाबा राहील. या प्रवचन सोहळ्याकरिता सर्व सद्भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून संगीतमय श्री कृष्ण कथा प्रवचनाचा लाभघ्यावा, असे आवाहन अमरावती महानुभाव वासानिक सेवा मंडळ तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावतीच्यावतीने करण्यात येत आहे.
0 Response to "श्रीकृष्ण मंदिर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीकृष्ण कथेचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें