-->
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा.

सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा.


• विज्ञान शाखेत जान्हवी चिचमलकर, निधी कोरे, सुयश बोरकर जिल्ह्यातून प्रथम द्वितीय व तृतीय तर कला शाखेत अनुराग बोरकर जिल्ह्यातून द्वितीय.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

अर्जुनी मोर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवार (2 मे) रोजी जाहीर करण्यात आला. अर्जुनी मोरगाव येथील, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल (विज्ञान शाखा) 100% लागला असून जान्हवी नरेश चिचमलकर (95.17%) गुणांसह विज्ञान शाखेत जिल्ह्यातून प्रथम व निधी पद्माकर कोरे(94.50%) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय, सुयश हेमराज बोरकर (92.83%) जिल्ह्यातून तृतीय ठरले. 
                  सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण चार विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. यात केसर चंद्रशेखर मुंगुलमारे (92.67%) गुणांसह गुणवत्ताधारक ठरली. तसेच कला शाखेचाही निकाल शंभर टक्के लागला असून त्यात अनुराग रोशनलाल बोरकर (89.50%) गुण घेऊन जिल्ह्यातून द्वितीय व तालुक्यातून प्रथम आलेला आहे. सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून एकूण 152 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते . त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत 35 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 91 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच कला शाखेतून एकूण 77 मुले परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यात प्राविण्य श्रेणीत 09, प्रथम श्रेणीत 27, द्वितीय श्रेणीत 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी माध्यमिक शिक्षण मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियान व गुगल मीट द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले होते. असे असतानाही दरवर्षीप्रमाणे सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा जिल्ह्यातून प्रथम विद्यार्थी देण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा, सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया , प्राचार्य जे. डी .पठाण, उपप्राचार्या ए. ए. गुरनुले व पर्यवेक्षक एस. जी. राघोर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Response to "सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article