भंडारा तालुक्यातील जामगाव (आबादी) गावाला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करून नागरी सुविधा उपलब्ध करा - नागरिकांची मागणी.
गुरुवार, 7 मई 2026
Comment
• घर पावती, जन्म ,मृत्यू, विवाह, नोंद कुठे करायची? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जनतेचा एकच सवाल!
• अन्यथा पहेला येथे रास्ता रोको आंदोलन करू.
•पत्रकार संजीव भांबोरे यांनी जामगाव (आबादी) गावाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी केली चर्चा.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील जामगाव (आबादी) येथे पत्रकार संजीव भांबोरे यांनी ६ मे २०२६ ला सकाळी ७ वाजता प्रत्येक्ष भेट देऊन नागरिकांशी विविध विषयावर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, जामगाव (आबादी) गावाची 55 ते 60 घरांची लोकवस्ती असून लोकसंख्या अंदाजे 200 ते 250 आहे . परंतु येथील नागरिकांना नागरी सुविधेपासून वंचित करण्यात आलेले आहे. जुने जामगाव या प्रकल्पबाधित गावाचे पुनर्वसन बोरगाव खुर्द येथे करण्यात आले आहे. तसेच वळद गावाचे पुनर्वसन सुद्धा बोरगाव खुर्द येथे करण्यात आले आहे .त्यामुळे ग्रामपंचायत जामगाव व वळद या नावाने ओळखले जाते .तथापि जामगाव या गावाचे महसुली हद्दीतील जामगाव (आबादी ) गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित होत नसल्यामुळे संपादित करण्यात आले नाही. त्या गावचे घरट्याक्स रद्द करण्यात आले, जन्म मृत्यूची नोंद, विवाह नोंदणी होत नाही. त्यांनी रामभरोसे राहायचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे ?स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या काळानंतर सुद्धा त्यांचे हक्क शासन ,प्रशासन हिरावून घेत आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे? यापूर्वी खंडविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, यांना पत्र देऊन समस्यांची जाणीव करून देण्यात आलेली आहे परंतु दखल घेण्यात आलेली नाही. गोसेधरण प्रकल्पग्रस्त जामगाव आबादी या गावाला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात किंवा त्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे पहेलाअन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अण्णाजी टिचकुले ,रवीना मोटघरे, मनोज मोटघरे,अनमोल चव्हाण, शेषराव राघोरते,माधुरी गोंडाने ,रत्नमाला घोडसे ,रवी ताले ,विनोद ताले ,साकेदन मेश्राम, यांनी केलेली आहे.
0 Response to "भंडारा तालुक्यातील जामगाव (आबादी) गावाला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करून नागरी सुविधा उपलब्ध करा - नागरिकांची मागणी."
एक टिप्पणी भेजें