-->
उल्हासनगरात बुद्ध जयंतीचा उत्साह — शहर रंगले ‘धम्ममय’ वातावरणात!..

उल्हासनगरात बुद्ध जयंतीचा उत्साह — शहर रंगले ‘धम्ममय’ वातावरणात!..


       सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

उल्हासनगर :- १ मे २०२६ उल्हासनगर शहरात आज शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या २५८८ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण परिसर ‘धम्ममय’ झाला होता.
सुभाष टेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य उभारलेला स्मारक तसेच रोषणाईत उजळलेला परिसर पाहताना नागरिक आनंदी वातावरणl मध्ये दिसत होते 
 सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. आमदार बालाजी किणीकर यांच्या हस्ते तथागतांना पुष्प अर्पण करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांनीही श्रद्धेने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली… त्यानंतर घेतलेली बुद्ध वंदना आणि शांततेचा संदेश देणारे मंत्र संपूर्ण परिसरात घुमत होते 
फक्त उत्सव नाही, तर संदेशही!..

या निमित्ताने बोधिवृक्षाचे रोप लावण्यात आले — पर्यावरण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
तसेच लोकांसाठी खास!
पौर्णिमेनिमित्त खीरदान करण्यात आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी याचा मनापासून आनंद घेतला.
 मान्यवरांची उपस्थिती:
आ. बालाजी किणीकर, उपमहापौर अमर लुंड, अंजली साळवे, लता पगारे, अर्चना देशमुख, सुरेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
 यशस्वी आयोजनामागची टीम:

धम्म पहाट समिती, संविधान बहुउद्देशीय संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही पद्धतीने कार्यक्रम पार पाडला.
 एकूणच…
उल्हासनगरात साजरी झालेली ही बुद्ध जयंती केवळ उत्सव नव्हती… तर समाजाला एकत्र आणणारा, शांतता आणि समतेचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उत्सव ठरला आहे

0 Response to "उल्हासनगरात बुद्ध जयंतीचा उत्साह — शहर रंगले ‘धम्ममय’ वातावरणात!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article