पिंडकेपार - बोदरा फाटा जवळ चार व्यक्तींवर रानडुकरांचा हल्ला.
रविवार, 3 मई 2026
Comment
• 4 व्यक्ती जखमी तीन भंडारा रवाना
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- साकोली जवळ असलेल्या पिंडकेपार - बोदरा फाटा जाणाऱ्या रस्त्यावर चार व्यक्तींवर रानडुकरांनि झडप घातली त्या चारही जखमीना भेट दिली असता तीन लोकांना भंडारा रवाना करण्यात आले
सविस्तर ऋत असे की बांपेवाडा येथील ताजराम जांभुळकर 54 वर्ष, अमरदीप राजीराम वलथरे 29 वर्ष, भजनदास आत्माराम बोंबाडे मनोज, ताजराम जांभूळकर 54 वर्ष दोन लोक कामाकरता व दोन लोक मरणाकारिता जात असताना हि पिंडकेपार जवळ असलेल्या बोदरा फाट्यावर डुकरांच् कळप जात असताना डुकरांनी यांच्यावर हल्ला केला त्यामध्ये तीन लोक गंभीर जखमी झाले तर 1 साधारण जखमी असून दीपक केवळ राम वलथरे, भजनदास आत्माराम बंबाडे, अमरदीप राजाराम वलथरे, या
3 लोकांना भंडारा रवाना करण्यात वन विभाग नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प डिपार्टमेंटचे लोकांनी आणि पोलीस विभागाच्या लोकांनी भेट दिली चौकशी केली परंतु कोणत्या प्रकारची मदत देण्यात आलेले नाही.उलट फॉरेस्ट चे लोक त्या लोकांना म्हणाले की बाबा तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता अशा पद्धतीचे बोलणे केले सायंकाळी 5 च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी जी रंगारी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली व जखमींना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जिल्हास्तरीय दवाखान्यात जे काही औषधोपचार करण्यात येईल त्यातील सुद्धा खर्च देण्यात यावा आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात तीन-चार घटना झाले वाघ हल्ल्यात तीन चार लोकांचा बळी घेतला आणि पिंडकेपार परिसरात रानडुकरांच्या कळप त्या ठिकाणी फिरत आहे अशी माहिती मिळालेली आहे त्या वन्यजीव प्राण्यांच्या बंदोबस्त फॉरेस्ट डिपार्टमेंट करावा अशी वारंवार मागणी करण्यात येत असताना सुद्धा कर्मचारी मात्र निंद्रावस्थेत असताना आपल्याला दिसत आहेत त्यांच्या कोणत्या प्रकारच्या उपाययोजना काही दिसत नाही आणि लोकांवर हल्ले होत आहेत लोकांच्या बळी जात आहे लोकांच्या शेताचे नुकसान होत आहेत याला जबाबदार कोण म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट तात्काळ उपाय योजना करावी वन्यजीव प्राणी जंगलाच्या बाहेर येऊ नये लोकांवर हल्ला होऊ नये याची सर्व जबाबदारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशी ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी जी रंगारी यांनी केलेले अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला
0 Response to "पिंडकेपार - बोदरा फाटा जवळ चार व्यक्तींवर रानडुकरांचा हल्ला."
एक टिप्पणी भेजें