-->
"प्रेरणा-भूमी" देव्हाडी येथे ऐतिहासिक सत्कार सोहळा संपन्न.

"प्रेरणा-भूमी" देव्हाडी येथे ऐतिहासिक सत्कार सोहळा संपन्न.


• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 1936 च्या ऐतिहासिक सभेच्या 90 वर्षांनिमित्त सामाजिक विचारवंतांचा गौरव.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी.

भंडारा/तुमसर :- तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्रेरणा-भूमीवर 2 मे 2026 रोजी ऐतिहासिक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. 2 मे 1936 रोजी Dr. B. R. Ambedkar यांच्या नेतृत्वाखाली शंभू सावकार (फंत्तु मेश्राम) यांच्या पुढाकाराने झालेल्या प्रबोधनात्मक सभेच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या काळी रेल्वे स्टेशन तलाव परिसरात सुमारे वीस हजार लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेने बहुजन समाजाला नव्या उमेदीची दिशा दिली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रातील साहित्यिक, पत्रकार, कवी, लेखक आणि समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शंभू सावकार यांच्या निवासस्थानापासून प्रेरणा-भूमीपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी नागरिकांनी महापुरुषांच्या विचारांचे तैलचित्र हातात घेऊन सत्यशोधक जलसा आणि इतिहास गौरवाची झलक साकारली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून विविध मान्यवरांचा “ऑल इंडिया महात्मा फुले समाज भूषण पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी शरद उत्तमराव चौरपगार, बाबा मोहड बेहराम, गौतम कांबळे (महाड), योगिता शरद चौरपगार, किरण पुरुषोत्तम सोनारे, किरण गौरखेडे, शिल्पा नागदेवते, साहेबराव वानखडे (औरंगाबाद), ज्येष्ठ मजूर नेते बी. एम. गजभिये, सरपंच आषिष देवकरण, माजी उपाध्यक्ष जयप्रकाश भवसागर, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार, अशोक हुमने, अनिल लोनकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर माटे, विदर्भ अध्यक्ष रविदास लोखंडे, लेखक उमेश बोरकर आणि संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच सामाजिक कार्यकर्त्या माटे ताई, करुणा बन्सोड शितल ताई रामटेके, चैताली मेश्राम, डा.कपील रत्नागिर, शिल्पा नागदेवते, कीशोर गजभिये, हर्षवर्धन देशभ्रतार, आशिम शेख, वसंत साठे, संघवर्धन देशभ्रतार,श्रेयाशं पाटिल,शुभम गजभिये, कपिल रंगारी,वैघ सर,निखिल बामने, व

कार्यक्रमाला विदर्भातील विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरयू दहाट यांनी केले, सूत्रसंचालन धर्मेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एम. गजभिये यांनी मानले. शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

हा कार्यक्रम मानवाधिकार ऑर्गनायझेशन, दिल्ली यांच्या वतीने धर्मेश पाटील यांनी आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविदास लोखंडे, श्रीकृष्ण देशभ्रतार, किशोर माटे आणि हर्षवर्धन देशभ्रतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Response to ""प्रेरणा-भूमी" देव्हाडी येथे ऐतिहासिक सत्कार सोहळा संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article