उदगीरचा बालाजी वाघमारे यांना १००% गुण..सर्वत्र कौतुक! .
मंगलवार, 12 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता के आवाज"
न्यूज नेटवर्क
उदगीर :- उदगीर येथे भाड्याच्या खोलीत राहून गवंडी काम करणारे श्री.
बालाजी वाघमारे (अनुसूचित जाती) यांचे सुपुत्र तथा उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूल मधील विद्यार्थी विष्णू बालाजी वाघमारे याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत तब्बल १००% गुण संपादन करून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गुणवत्तेचा नवा इतिहास रचला आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण अनुसूचित जातीतील समाजासाठी प्रेरणादायी आहे. विष्णूचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
0 Response to "उदगीरचा बालाजी वाघमारे यांना १००% गुण..सर्वत्र कौतुक! ."
एक टिप्पणी भेजें