लाखनी तालुक्यात १६ मेपासून.
रविवार, 10 मई 2026
Comment
• गृहगणनेचा 'श्रीगणेशा' १५९ प्रगणक आणि 30 पर्यवेक्षकांवर जबाबदारी.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लाखनी तालुक्यातील १०४ गावांमध्ये १६ मे पासून प्रथम टप्प्यातील घरगणनेच्या कामाला सुरुवात होत आहे. या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच ८ मे रोजी संपन्न झाले. मुख्य जनगणना अधिकारी तथा तहसीलदार शीतल घावटे यांच्या नेतृत्वात हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. जनगणनेचे काम अत्यंत अचूक आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
२३ एप्रिलपासून प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचला सुरुवात झाली होती. एकूण ५ बॅचमध्ये हे
प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, ८ मे रोजी पाचव्या व अंतिम बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यामध्ये प्रगणकांना प्रत्यक्ष 'डेमो' देऊन तांत्रिक बाबींचे निराकरण करण्यात आले. या मोहिमेसाठी तालुक्यात एक मोठे प्रशासकीय जाळे विणण्यात आले आहे. मुख्य जनगणना अधिकारी तहसीलदार, १ सहकारी अधिकारी, १तांत्रिक सहाय्यक, ४ फिल्ड ट्रेनर, ३० पर्यवेक्षक, १५९प्रगणक प्रत्यक्ष काम करणार आहेत. प्रशिक्षण
प्रमुख म्हणून सहाय्यक महसूल अधिकारी मनिष अवसरे यांनी जबाबदारी सांभाळली असून प्रशिक्षक म्हणून विवेक हजारे, मनीष मेश्राम, दर्याव खंडारे आणि अतुल व हाडे यांनी सर्व प्रगणकांना व पर्यवेक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी, मोबाईल अॅपचा वापर आणि माहिती संकलित करण्याच्या पद्धतींबाबत यावेळी सविस्तर उजळणी करण्यात आली.
0 Response to "लाखनी तालुक्यात १६ मेपासून."
एक टिप्पणी भेजें