-->
श्रीगीतामृत...

श्रीगीतामृत...


• कर्मयोग.. भक्तियोग.. ज्ञानयोग भाग १
• प्रत्येक कर्मात तीन योग आवश्यक.

भंडारा/तुमसर :- श्रीमद्भगवतगीते मध्ये अठरा अध्याय आहे, पहील्या सहा अध्यायात कर्मयोग सांगितला आहे, पुढील सहा अध्यायात (७ ते १२)) भक्तियोग सांगितला, बाराव्या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकात भक्ताची लक्षणे सांगितली, आणि शेवटच्या सहा अध्यायात (१३ते१८) ज्ञानयोग समजावून सांगितला, तेराव्या अध्यायात ज्ञानाची लक्षणे, चौदाव्या अध्यायात गुनातीताची लक्षणे अशा रीतीने संपुर्ण गीतेत कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समन्वय आहे.... जीवनात केवळ ज्ञानयोग, केवळ भक्तियोग किंवा केवळ कर्मयोग उपयोगी ठरणार नाही, या तिन्ही योगांचा समन्वय साधता आला तरच जीवन सुंदर होईल, आणि माणसाचे प्रत्येक कर्म चमकदार होईल. केवळ ज्ञानयोग माणसाला शुष्क वेदांती बनवील... अहं ब्रम्हास्मी... सर्व खळु इदं ब्रम्ह... असे सारखे बोलत माणुस सगळीकडे फिरू लागला तर त्याची वेड्यांच्या इस्पितळात रवानगी करावी लागेल.. केवळ भक्तियोग माणसाला भोळा बावळट बनवील आणि जीवनातील जबाबदाऱ्या तो निट पार पाडनार नाही, किंवा आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्याला उपद्रवी ठरेल. केवळ कर्मयोगही न पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांचे आणि पापाचे किंवा दोषांचे ओझे पाठीवर घेवून फिरत राहील. म्हणून प्रत्येक कर्मात कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा विवेकपूर्वक समन्वय साधला तरच कामात (कर्मात) शोभा येईल.

व उन्नती (उर्ध्वगती) होईल. म्हणून प्रत्येक कर्मात तीनही योगांचा संगम आवश्यक आहे. साधे उदाहरणः गृहिणी रोज घरात स्वयंपाकपाणी करते. स्वयंपाकातील पदार्थ (भात, भाजी, आमटी, पोळ्या इत्यादी) बनविणे हा झाला तिचा कर्मयोग, परंतू जेवनात बनविलेले सर्व पदार्थ माझा पती, माझी मुले जेवणार आहेत, आपल्याकडे येणारे पाहुणे जेवणार आहेत, या भावनेने भक्तिभावाने प्रत्येक पदार्थ बनवितांना ती ती खबरदारी घेते, उदाहरणार्थ: तांदुळ निट निवडलेले, मऊसर भात बनविणे, कणिक चांगली मळून लुसलुशीत पोळ्या (चपाती) बनविणे, भाजी, आमटी, कोशिंबीर इत्यादी बनवतांना तिखट, मिठ, मिरची, मसाला इत्यादी प्रमाणशीर वापरून प्रत्येक पदार्थ चविष्ट-खाणाऱ्याने पुनाः पुनाः मागावा असा बनवीने या सर्व गोष्टी करतांना तिची जी मनोभावना असते त्याचे नांव भक्तियोग, पण अशी भावना केवळ असणेही पुरेसे नाही, त्या स्त्रीला प्रत्येक पदार्थ कसा चांगला (रुचकर, स्वादिष्ट) बनवावा याचे ज्ञानही पाहीजे, उदा :- कणीक भिजवतांना पाणी किती घालने, नंतर पोळ्या कशा गोल लाटने, आमटी, भाजी इत्यादीत तिखट, मीठ, मसाला किती प्रमाणात घालने, डाळ शिजली की चांगली शिजली असे समजने इत्यादी सर्व गोष्टींचे ज्ञान असणे, हा झाला तिचा ज्ञानयोग, अशा प्रकारे कर्मयोग, भक्तियोग, आणि ज्ञानयोग या तिघांचा सुमेळ समन्वय साधला गेला तरच स्वयंपाक बनविण्याच्या कामात (कर्मात) यशस्वीता येईल. क्रमशः उद्याच्या अंकात पुढील भाग.

          दंडवत प्रणाम!..
              महंत.श्री.गोपालव्यास कपाटे.
                           महानुभाव.
                     उरळी कांचन पुणे.

0 Response to "श्रीगीतामृत..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article