-->
पहेला येथे संघर्ष करिअर अकॅडमी चे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या हस्ते उद्घाटन.

पहेला येथे संघर्ष करिअर अकॅडमी चे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या हस्ते उद्घाटन.



• जिद्द ,मेहनत, व चिकाटी च्या जोरावर यश नक्की 

• संघर्ष करिअर अकॅडमी चामट मेडिकलच्या समोर तितीरमारे यांच्या पहेला येथील निवासस्थानी मार्गदर्शन 

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे दिनांक ४ मे २०२६ ला सकाळी १० वाजता संघर्ष करिअर अकॅडमी चे उद्घाटन ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनलचे संपादक संजीव भांबोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सावित्रीबाई फुले संस्थेचे संचालक रजत राऊत , संघर्ष करिअर अकॅडमी चे संचालक कृपाल ढवळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उद्घाटक पत्रकार संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द ,मेहनत्व ,चिकाटी असेल तर भविष्यात ते यशस्वी ठरत असतात. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात आपल्याला यशस्वी व्हायचे व आयुष्य घडवायचे असेल तर कमीत कमी आपण १२ तास अभ्यास केलं पाहिजे तरच आपण यशाची पायरी गाठू शकतो. या संघर्ष करिअर अकॅडमी मध्ये पोलीस भरती, रेल्वे ,आर्मी ,मिलिटरी, वन विभाग, तलाठी ,आरोग्य विभाग, शिक्षक, एस एससी जी डी या स्पर्धा परीक्षेत बाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून कमीत कमी फीस आकारली जाईल. व गोरगरिबांच्या मुलांकरता एकमेव क्लासेस आहे. व तुमच्या स्वप्नांना दिशा देणारे एकमेव केंद्र असेल. यातच प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करण्याकरता अनुभवी व तज्ञ शिक्षक ,पेपर प्रॅक्टिस, गणित व तर्कशक्ती ,फिजिकल ट्रेनिंग मार्गदर्शन, शांत व अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावेळी बऱ्याच संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

0 Response to "पहेला येथे संघर्ष करिअर अकॅडमी चे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या हस्ते उद्घाटन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article