-->
भंडाऱ्यात मध्यरात्री तरुणाची हत्या !.

भंडाऱ्यात मध्यरात्री तरुणाची हत्या !.

.                   मूतक रक्ताच्या थारोळ्यात 

• घटना सीसीटीव्हीत कैद ८ आरोपी ताब्यात.

• जून्या वादाचे घर करून होते वैमनस्य.

साप्ताहिक जनता की आवाज" वृत्तपत्र प्रतिनिधी

भंडारा :- भंडारा शहरातील जलाराम

चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या रक्तरंजीत हल्ल्याने भंडारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातुन झालेल्या या हल्ल्यात एका तरूणाचा मृत्यू झाला. कार्तिक भंडारी रा.संताजी वार्ड भंडारा असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ विधीसंघर्ष आरोपींना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार कार्तिक भंडारी हा जालाराम चौक परिसरातच रुईच्या दुकानात बेड व गाद्या तयार करण्याचे

काम करीत होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जलाराम चौक परिसरात असताना काही जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांसह लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात असून, या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्तिकला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत आठ विधिसंघर्ष आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भररस्त्यात घडलेल्या या हत्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिस-किडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणातील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग तपासला जात आहे. विशेष महणजे जलाराम चौक हा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतर-वर आहे. पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर असलेल्या भर चौकात खुनाची घटना होणे हे गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.

0 Response to "भंडाऱ्यात मध्यरात्री तरुणाची हत्या !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article