-->
श्री गीतामृत...

श्री गीतामृत...


• कर्मयोग.. भक्तियोग.. ज्ञानयोग - भाग २

• प्रत्येक कर्मात तीन योग आवश्यक.

भंडारा/तुमसर :- (उर्वरित भाग) तसे पाहीले तर कित्येक वेळा घरच्यापेक्षा उपहारगृहातील पदार्थ चटकदार (स्वादिष्ट) असतात, तिथे फक्त कर्मयोग आणि ज्ञानयोग असतो, पण भक्तियोग नसतो म्हणून कधी कधी पदार्थात माशी अथवा झुरळ (कीडा) सापडते कारण तिथे गिऱ्हाईकाबद्दल प्रेमभावना नसते केवळ व्यापारीवृती असते.. स्त्रीने जेवन बनविण्याचा कर्मयोग आचरला माझा पती, माझी मुले, आतिथी यांना सुग्रास जेवन घालन्याचा तिच्यात भक्तियोगही असला, परंतु ज्ञानयोग नसेल-किती प्रमाणात तिखट, मीठ, मसाला इत्यादींचा कसा वापर करायचा, याचे ज्ञान नसेल तर काय होईल, थ्री, इन, वन पदार्थ खाण्याची पाळी जेवना-यावर येईल, (स्वयंपाक चांगला होणार नाही) या सर्वांवर कडी, म्हनजे चांगले जेवन व्हावे ही भावना-भक्तियोग आहे, चांगले जेवन बनविन्याचे कौशल्य ज्ञानयोग आहे पण कर्मयोग नसेल - स्त्रीने स्वयंपाक (जेवण) करण्याचेच नाकारले, चुलीवर भात-भाजी इत्यादी चढवलीच नाही-तर स्वयंपाक कस बनणार?या प्रमाणे जेवन बनविणे या सारख्या साध्या कर्मातही कर्मयोग, भक्तियोग, व ज्ञानयोग यांचा सुमेळ समन्वय नसेल तर त्या.कर्माची पूर्ती होणार नाही,त्यात बरकत येणार नाही.

 
उदा :- एखाद्या विद्यार्थ्याला हत्ती ह्या प्राण्यावर निबंध लिहा, असा प्रश्न आला तर निबंध लिहिण्याची त्याची क्रीया हा कर्मयोग, निबंध लीहितांना पेपरात डाव्या बाजुला व्यवस्थित समास सोडने, सुंदर, सुवाच्य, वळनदार अक्षर काढणे, पेपरावर कुठेही शाईचे डाग पडून न देणे, हा झाला त्याचा भक्तियोग, आणि हत्ती संबंधी संपुर्ण माहिती, हत्तीला दोन मोठे रूंद कान असतात, चार पाय असतात, एक शेपटी असते वगैरे सविस्तर माहिती लिहीने हा झाला त्याचा ज्ञानयोग, या प्रमाणे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिन्हींचा त्याच्या उत्तरपत्रीकेत समन्वय झाला म्हणजे दहातील नऊ मार्क मिळणारच, विद्यार्थी हत्ती या प्राण्यावर निबंध लिहीण्याचा कर्मयोग आचरील :- पण व्यवस्थित समास सोडला नाही, अक्षर वेडेवाकडे काढले, पेपरवर शाईचे डाग पडलेले असतील, लिहितांना खाडाखोड केली असेल, अशा रितीने त्याने भक्तियोग आचरला नाही, किंवा हत्तीविषयी चुकीची माहीती लिहीली, म्हणजे ज्ञानयोग आचरला नाही, किंवा त्या विद्यार्थ्यात (भक्तियोग) आहे, सुंदर वळणदार अक्षर लिहीण्याची क्षमता आहे (ज्ञानयोग) त्या विद्यार्थ्याला हत्तीसंबंधी संपुर्ण माहिती अवगत आहे, पण त्याने कर्मयोगच आचरला नाही (म्हणजे एक अक्षरही न काढता (लिहीता) उत्तरपत्रिका कोरीच परत दिली) तर तो विद्यार्थी नापास होणारच, म्हणून कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग तिन्हींचा समन्वय (सुमेळ) प्रत्येक कर्मात असावा...

दंडवत प्रणाम!.🙏🙏

                             महंत. 
               श्री.गोपालव्यास कपाटे
             महानुभाव,उरळी कांचन पुणे

0 Response to "श्री गीतामृत... "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article