वाघाच्या झडपेत वृद्ध महिलेचा मृत्यू.
सोमवार, 11 मई 2026
Comment
. वाघाच्या हल्यात कौशल्य रहाटे
• अर्जुनी मोरगाव तालुक्यात सलग दुसन्या दिवशी घटना.
• तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला मातृदिनाच्या दिवशीच मुलाने गमावली आई.
साप्ताहिक जनता की आवाज
वृत्तपत्र प्रतिनिधी.
अर्जुनी मोरगाव :- तालुक्यातील वडेगाव बांध्या परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १० मे) सकाळी उघडकीस आली. सलग दुसन्या दिवशी बाघाने मानवावर हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे.
मृत महिलेचे नाव कौशल्या हरिदास रहाटे (वय ६५, रा. वडेगाव बांध्या, ता. अर्जुनी मोरगाव) असे आहे. त्या तेंदूपत्ता संकलनासाठी जंगल परिसरात गेल्या असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वनपरिक्षेत्र गोंठणगाव अंतर्गत नक्षत्र केशोरी बीटातील कक्ष क्रमांक २८२ मध्ये ही घटना घडली. कौशल्या रहाटे या आपल्या सुनेसह जंगलात गेल्या होत्या. यावेळी अचानक वाघ समोर येताच त्यांनी बचावाचा प्रयत्न केला, मात्र वाघाने झडप घालत त्यांना ठार केले.
सलग दुसन्या दिवशी हल्ला
विशेष म्हणजे, याच परिसरात एक दिवस आधी (ता. १ मे) तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. ती घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय
गेल्या काही दिवसांपासून वडगाव बांध्या व परिसरात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. गावालगतच्या शेतांमध्ये तसेच मानवी वस्त्रीजवळही वाघांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वीही या परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून एका चिमुकल्याचा जीव गेला होता.
0 Response to "वाघाच्या झडपेत वृद्ध महिलेचा मृत्यू."
एक टिप्पणी भेजें