नव्या आजाराचा धोका !, आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक.
शनिवार, 30 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई/नागपूर :- आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे , आजाराचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील इबोलासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची, तसेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत या रुग्णांची देखरेख करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, विमानतळ तसेच इतर यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधण्यात येत आहे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, विशेष रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळांमधील सुविधा, अतिदक्षता विभागामध्ये
भारत अलर्ट मोडवर
वैद्यकीय उपचारांच्या सुविधेची उपलब्धता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांमध्ये या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळावरील यंत्रणेचा आरोग्ययंत्रणेशी समन्वय आहे, तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील सर्वेक्षण विभागाकडूनही यासंदर्भातील माहिती देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचना
जारी करण्यात आल्या आहेत. इबोला हा प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक स्त्राव, उलटी किंवा दूषित वस्तूंशी थेट संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सामान्य परिस्थितीत हवेतून पसरत नाही. तसेच कोविड-१९ इतका सहज संसर्गजन्य नाही, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मानक संसर्ग नियंत्रण पद्धतींचे पालन करणे, योग्य हात स्वच्छता राखणे, सार्वत्रिक प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे, तसेच अनावश्यक भीती टाळून व्यावसायिक तयारी ठेवण्याचे आवाहन निवासी डॉक्टरांना करण्यात आले आहे. देशात इबोलाचा उद्रेक किंवा समुदायस्तरावर या आजाराचा प्रसार नोंदवण्यात आलेला नाही.
0 Response to "नव्या आजाराचा धोका !, आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक."
एक टिप्पणी भेजें