शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग 35 हजाराची रोख रक्कम जळून खाक.
शनिवार, 30 मई 2026
Comment
• पवनी तालुक्यातील भुयार येथील घटना
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील भुयार येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून लाखो रुपयाचा नुकसान
हरभा बाळबुदे व त्यांची पत्नी आपल्या शेताकडे गेले असताना . आज दिनांक 30 मे 2026 ला
सकाळी 11 वाजता घरातून धूर निघताना दिसले .घराजवळील लोकांनी आत प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला
या आगीमध्ये 35 हजार रोख रक्कम व गहू तांदूळ महत्वाची कागदपत्र व उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे.
हरबा बाळबूधे यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळू फुलबांधे यांनी केली आहे.
0 Response to "शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग 35 हजाराची रोख रक्कम जळून खाक."
एक टिप्पणी भेजें