भंडाऱ्यात कॉग्रेसचे 'जलसमाधी आंदोलन'
शनिवार, 16 मई 2026
Comment
आ. नाना पटोले, खा. प्रशांत पडोळेंसह काँग्रेस कार्यकर्ते उतरले नदीच्या पाण्यात !
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगार युवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत आज दि.१५ मे २०२६ रोजी भंडाऱ्यातील कारधा येथे वैनगंगा नदी पात्रात भव्य 'जलसमाधी आंदोलन' सुरू केले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, भंडारा-गोंदियाचे खा डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधूले आहे.
आजच्या जलसमाधी आंदोलनाचा इशारा कॉंग्रेसने काही दिवसांअगोदरच दिला होता. त्यामुळे पहाटेपासूनच कारधा परिसरात हजारो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि काँग्रेस कार्यकत्यांची गर्दी उसळली होती. हातात फलक, घोषणांनी दणाणलेला परिसर आणि नदी पात्रात उतरलेले आंदोलक यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. 'शेतकऱ्यांना न्याय द्या', धान खरेदीची लिमिट वाढवुन द्या, ओबीसीची स्वतंत्र जणगनना करा, 'सरकार जागे व्हा' अशा घोषणांनी वैनगंगा नदीकाठ दणाणून गेला.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या
जिल्हाधिकारी सावनकुमार आंदोलनस्थळी
आंदोलनाच्या तब्बल पाच तासानंतर भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकुण घेत त्या सोडविण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगत आंदोलकांना नदीतुन बाहेर येण्याची विनंती केली मात्र ज्या प्रमाणे राज्य सरका रने कांद्याचा प्रश्न तात्काळ सोडविला त्याच प्रमाणे भंडारा गोंदिया जिल्हयातील धान व मका खरेदीचा प्रश्न तात्काळ सोडवून धान खरेदीला घालण्यात आलेली लिमिट ची अट शिथील करण्याची मागणी यावेळी केली. जोपर्यंत हि मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आ. नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट करीत पाण्याच्या बाहेर येण्यास साफ नकार दिला.
प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अनेक वर्षांपासून आंदोलने, निवेदने आणि बैठका होत असतानाही प्रश्न प्रलंबितच असल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने अखेर जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यापूर्वी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार प्रशांत पडोळे यांच्याशी चर्चा करून मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणताही ठोस निर्णय न
झाल्याने काँग्रेसने सरकारच्या आश्वासनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'फक्त बैठका आणि आश्वासने' पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शेकडो कार्यकत्यांनी जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती चिघळू नये यासाठी
या आहेत मागण्या....
आंदोलनकर्त्यांनी शासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. धान बोनस वाढविणे, शेतकऱ्यांना दिवसा १६ तास अखंड वीजपुरवठा करणे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करणे, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देणे, तसेच जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी दूर करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनस्थळी बॅरिकेट्स उभारण्यात आले होते, तसेच नदी परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बोट-चिीही व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले, मात्र आंदोलकांचा आक्रोश आणि संताप स्पष्टपणे दिसून येत होता.
आंदोलनात माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, जि.प.सदस्य रमेश पारधी, प्यारेलाल वाघमारे, पव वंजारी, कलाम शेख, जि.प.अध्यक्ष कविता उईके, सभापती शितल राऊत, सविता वाघावे, उमेश मोहतुरे, यांच्यासह भंडारा गोंदिया जिल्हयातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Response to "भंडाऱ्यात कॉग्रेसचे 'जलसमाधी आंदोलन'"
एक टिप्पणी भेजें