पोलिस यंत्रणा आयपीएल सट्टेबाजीचे रॅकेट उध्वस्त करणार ?
शनिवार, 16 मई 2026
Comment
• शहरात जुगार जोमात, पोलिस प्रशासन कोमात अर्थकारण झाल्याचा चर्चांना ऊत.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- शिक्षणाचे माहेरघर शहर म्हणून ओळख असलेल्या लाखनी शहराला सध्या आयपीएल सट्टेबाजीच्या विळख्याने पार पोखरून काढले आहे. शहरात आयपीएल सट्टेबाजीने उच्छाद मांडला असून तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तव समोर आणूनही, स्थानिक पोलीस प्रशासनाला
अद्याप जाग आलेली नाही. सलग वृत्तमालिका प्रसिद्ध होऊन शहरात खळबळ उडाली असताना, पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने लाखनी पोलिसांचे सट्टेबाजांशी नेमके नाते काय? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.
पोलिसांच्या या ढिम्म कारभारामुळे सट्टेबाजांचे धाडस अधिकच वाढले असून,
तरुणाईच्या उद्ध्वस्त भविष्याला जबाबदार कोण ?
सट्टेबाजीच्या नादात लाखनीतील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांतील तरुण मुल कर्जबाजारी झाली आहेत. कर्जबाजारी झालेले तरुण नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आहेत. कर्ज फेडण्यासाठी घरातील दागिणे, मोबाईल, दुचाकी वाहन गहाण ठेवत आहेत. व गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असताना पोलीस मात्र हातावर हात धरून बसले आहेत. या सट्टेबाजीमुळे शहरात एखादी मोठी गुन्हेगारी घटना किंवा अनुचित प्रकार घडला, तर त्याला जबाबदार कोण? असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व्यवहार
विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काही चौक व टपऱ्यांवर सट्टेबाजीचे व्यवहार उघडपणे चालतात. रात्रीच्या वेळी संशयास्पद तरुणांची गर्दी पोलिसांना दिसत नाही का? गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंदे फोफावत असतील तर, जाणीवपूर्वक दिलेली सवलत नाही ना ? याचे उत्तर आता गृहविभागाला द्यावे लागणार आहे.
त्यांना कोणाचे तरी वरदहस्त असल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. शहरातील सट्टेबाज मोबाईलवर लाखो रुपयांच्या आयडी वाटणारे व नागपूरच्या
वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का?
स्थानिक पातळीवर सट्टेबाजांना अभय मिळत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने, आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच या प्रकरणात 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची गरज आहे. स्थानिक पोलिसांवर विसंबून न राहता, विशेष पथकामार्फत थाडी टाकल्यास लाखनीतील पांढरपेशी सूत्रधारांचे चेहरे समोर येण्याची दाट शक्यता आहे.
बुकीशी संधान साधणारे मोठे मासे अद्याप मोकळेच का? पोलिसांना खरोखरच माहिती नाही की माहिती असूनही अर्थपूर्ण तडजोडीसाठी डोळेझाक केली जात आहे? असा संशय आता बळावू लागला आहे.
0 Response to "पोलिस यंत्रणा आयपीएल सट्टेबाजीचे रॅकेट उध्वस्त करणार ?"
एक टिप्पणी भेजें