-->
• जुन्या वादातून चौकीदाराचा गळा आवळून खून.

• जुन्या वादातून चौकीदाराचा गळा आवळून खून.


• दोन नराधमांना बेड्या२४ तासांत आवळला फास तुमसर पोलिसांची कारवाई

• सीतासावंगी परिसरात दहशतीचे वातावरण

• तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन संशयितांना जेरबंद केले.
"साप्ताहिक जनता की आवाज"
       वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/तुमसर :- सीतासावंगीच्या घनदाट जंगलातील शांतता बुधवारी मध्यरात्री एका रक्ताळलेल्या किंकाळीने भंग पावली. चारपाच वर्षांपासून एका बंद पोल्ट्रीफार्मची राखण करणाऱ्या ६५ वर्षीय महादेव शंकर कामथे यांचा अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने खून करण्यात आला. या थरारक घटनेने संपूर्ण तुमसर तालुक्यात खळबळ उडाली. पोलिसांनी

मृतक महादेव कामथे हे नित्यनियमानुसार २९ एप्रिलच्या सायंकाळी ६:३० वाजता वहीद कुरेशी यांच्या पोल्ट्रीफार्मवर ड्युटीसाठी गेले होते. मात्र काळाने तिथे आधीच विळखा घातला होता. ३० एप्रिलच्या पहाटे जेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला तेव्हा पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मारेकऱ्यांनी केवळ वार केले नाहीत, तर महादेव यांच्या गळ्यात पांढऱ्या

कापडाने फास आवळून त्यांचा श्वास रोखला होता. शरीरावर धारदार शस्त्रांचे खोल वार हे आरोपींच्या क्रूरतेची साक्ष देत होते. या खुनामागे जुन्या वादाची

किनार असल्याचे तपासात समोर आले आहे. संदीप मेश्राम (रा. सीतासावंगी) आणि अरमान उर्फ बिट्या गौरेकर (रा. बघेडा) या दोघांनी संगनमत

करून हा कट रचल्याचा आरोप मृतकाच्या पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीही याच आरोपींनी महादेव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तो डाव तेव्हा चुकला, पण बुधवारी रात्री आरोपींनी जुन्या वैराचा बदला घेत महादेव यांचा काटा काढला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. गुन्हा दाखल होताच (अप.क्र. २२२/२०२६) पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण

आणि खबऱ्यांच्या मदतीने काही तासांत संदीप आणि अरमान या दोघांना बेड्या ठोकल्या भारतीय न्यायसंहिता २०२३च्या कलम १०३ (१) नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला. जंगलातील या निघृण हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे सावट असले तरी पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला आहे. आता या खुनामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

0 Response to "• जुन्या वादातून चौकीदाराचा गळा आवळून खून."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article