-->
OBC समाजाच्या अस्तित्वासाठी गोरेगावात भव्य बाईक रॅली व आंदोलन.

OBC समाजाच्या अस्तित्वासाठी गोरेगावात भव्य बाईक रॅली व आंदोलन.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
गोंदिया :- देशभर सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेमध्ये OBC समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने संपूर्ण OBC समाजामध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. OBC समाजाच्या हक्काचा, अस्तित्वाचा आणि भविष्यातील आरक्षण व अधिकारांचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनला असून आता समाज रस्त्यावर उतरू लागला आहे.

याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता ठाणा रोड, गोरेगाव येथे भव्य बाईक रॅली व निवेदन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बाईक रॅली ठाणा चौक ते तहसील कार्यालय, गोरेगाव या मार्गावर काढण्यात येणार असून शासनाकडे OBC समाजासाठी स्वतंत्र जनगणना कॉलमची जोरदार मागणी करण्यात येणार आहे.

“आज जर आपण आपल्या हक्कासाठी उभे राहिलो नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना न्याय मिळणार नाही,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे युवक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व OBC बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“OBC जनगणना झालीच पाहिजे”, “OBC ना स्वतंत्र कॉलम मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी गोरेगाव शहर दणाणून जाणार असल्याचे चित्र आहे.

शासनाने OBC समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आयोजकांनी दिला आहे.

0 Response to "OBC समाजाच्या अस्तित्वासाठी गोरेगावात भव्य बाईक रॅली व आंदोलन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article